गोवा

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

Goa Today's Breaking News: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या विविध क्षेत्रातील ठळक बातम्यांचा आढावा.

Pramod Yadav

दहावीचा 92.38 टक्के निकाल

SSC Result

पिर्ला केपे चिरे खाणीवर धाड; नऊ यंत्रे जप्त

खाण खात्याने पिर्ला केपे येथे आज सकाळी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या चिरे खाणीवर धाड टाकून चिरे काढण्यासाठी वापरण्यात येणारी नऊ यंत्रे जप्त केली आहेत. सदर चिरे काढण्यासाठी बेसुमार झाडांची कत्तल केली असून कोट्यावधी रुपयांचे चिरे काढून नेले आहेत.

बेदिक्कत पणे सुरू असलेल्या या व्यवसायावर आज अचानकपणे कारवाई झाल्याने या भागातील चिरे काढणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पिर्ला येथील ही खाण केपेतील एका राजकारण्याच्या पाठबळावर सुरू होती.

केपेचे संयुक्त मामलेदार आणि केपे पोलिसांच्या उपस्थितीत धडक कारवाई राबऊन पाच पॉवर टिलर आणि चिरे काढण्याचे चार आधुनिक यंत्रे मिळून लाखो रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

Mine Dept Raid
Mine Dept Raid

बोर्डा येथील मोडकळीस आलेल्या घरात सापडला मृतदेह

बोर्डा येथील मोडकळीस आलेल्या घरात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

काणकोणात समुद्रामार्गे दारु तस्करी पकडली!

काणकोण पोळे येथून समुद्रामार्गे कर्नाटकात एका लहान बोटीव्दारे सुमारे दोन लाखांच्या दारु तस्करीचा प्रयत्न काणकोण पोलिसांनी ठरवला फोल. दारुसहीत तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या बोटीसह पोळेतील राजू नाईक नामक इसमाला केली अटक.

सुकूर येथे ट्रक आणि कारचा अपघात

Goa Accident

सुकूर जंक्शन येथे ट्रक आणि कारचा अपघात. अपघातात कारचे नुकसाना झाले असून, चालक तरुणी सुखरुप आहे. दरम्यान, धडक दिल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला.

Goa Accident

नायजेरीयन तरुणीच्या ताब्यातून 15 लाखांचा गांजा जप्त

Mapusa Drug Case

अमली पदार्थ विरोधी पथकाची म्हापसा येथे कारवाई, फेथ शिमेरी (२३, नायजेरीया) या तरुणीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 15.10 लाख किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

मांडवीखाडी वेंगुर्ला येथे म्हापशातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Boy Drowned In Vengurla

मांडवीखाडी वेंगुर्ला येथे म्हापशातील विद्यार्थी यश देऊलकर (१६) याचा बुडून मृत्यू झाला आहे. यशने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. निकाल पाहण्यापूर्वीच यशचा मृत्यू झाला आहे.

बस्तोडा तार नाक्यावर कर्नाटक नोंदणीकृत कार उलटली

Bestora Accident

बस्तोडा तार नाक्यावर कर्नाटक नोंदणीकृत कार उलटली. कारमधील चार पर्यटक प्रवाशी दारुच्या नशेत असल्याची माहिती. मदत करण्यासाठी आलेल्या स्थानिकांसोबत असभ्य वर्तन करुन सर्वजन फरार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT