Goa Loksabha | RGP Manoj Parab And Viresh Borkar Dainik Gomantak
गोवा

Goa Today's Top News: राजकारण, गुन्हे, अपघात, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील ठळक बातम्या

Goa Today's Live News Update: गोव्यातील राजकारण, गुन्हे, पर्यटन, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील घटनांचा आढावा.

Pramod Yadav

काँग्रेसकडून नाहक अपप्रचार - मनोज परब

Goa Loksabha

सहा नोव्हेंबरमध्ये आम्ही इंडिया आघाडीच्या निमंत्रणाची वाट पाहत आहोत असे जाहीर केले होते. त्यानंतर आम्ही दोन्ही जागा जिंकल्यानंतर इंडिया आघाडीलाच पाठिंबा देऊ असे जाहीरपणे सांगितले होते. १९ डिसेंबरला आम्ही आमचे उमेदवार जाहीर करून प्रचारास सरुवातही केली.

तेव्हा काँग्रेसकडून, आरजीला आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिला, पण तेच चर्चेला आले नाहीत असा अपप्रचार करण्यात आला.

म्हणून आता आम्ही जाहीरपणे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इंडिया आघाडीत सशर्त सहभागी होण्याचा प्रस्ताव देत आहोत. त्यावर काँग्रेसने उत्तर द्यावे, असे 'आरजी' प्रमुख - मनोज परब म्हणाले.

डॉक्टर घनश्याम वैद्य काळाच्या पडद्याआड

बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा येथील कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट या इस्पितळाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. घनश्याम वैद्य (६५) यांचे आज १५ एप्रिल रोजी सकाळी अल्पआजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन डॉक्टर पुत्र असा परिवार आहे.

घटप्रभा येथील या आरोग्य केंद्राला सामान्य लोक आरोग्यधाम म्हणूनच ओळखत होते. या केंद्रात गोव्यातील कित्येकांचे आधारस्थान होते. या संपूर्ण इस्पितळाची देखभाल डॉ. वैद्य हे करत होते.

डॉ. वैद्य हे मूळ केरी-फोंडा येथील प्रसिद्ध अशा दादा वैद्य घराण्यातले असून त्यांचे वडील स्व. डॉ. माधवराव वैद्य यांनी घटप्रभा येथे हे आरोग्य केंद्र स्थापन केले होते.

मंगळवारी भाजप तर बुधवारी काँग्रेसचे उमेदवार दाखल करणार अर्ज

Goa Loksabha

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवार मंगळवारी (दि.१६) तर काँग्रेस उमेदवार बुधवारी (दि.१७) एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत नागपूरमध्ये, नितीन गडकरींची घेतली भेट

CM Pramod Sawant

नितीन गडकरींच्या प्रचारसभेत हजेरी लावण्यासाठी गोव्याचे प्रमोद सावंत यांनी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. सावंत यांनी गडकरींची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले.

जागावाटपच्या चर्चेसाठी आरजीच्या काँग्रेससमोर तीन अटी अन् पाच दिवसांची मुदत

Goa Loksabha

आरजीने जागावाटपवर काँग्रेसोबत चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. यासाठी आरजीने काँग्रेससमोर तीन अटी ठेवत 20 एप्रिलपर्यंत मुदत दिला आहे.

पट्टण-बाळ्ळीत साडेपाच लाखांची घरफोडी, दागिने लंपास

पट्टण -बाळ्ळीत येथे साडेपाच लाख रुपयांची घरफोडीची घटना उघडकीस आली असून, सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.

Goa Theft Case

मुंगूल, फातोर्डा येथे दुचाकीचा अपघात, झारखंडचे दोघे जागीच ठार

Goa Accident

मुंगूल, फातोर्डा येथे रविवारी रात्री वीज खांबाला धडकून दुचाकीचा अपघात झाला. यात झारखंडच्या दोघांच्या जागीच मृत्यू झाला.

कदंबचे स्टिअरिंग लॉक, बस शेतात घुसली

पर्रा-साळगाव मार्गावर कदंब बसचे स्टिअरिंग लॉक झाल्याने बस शेतात घुसली, बसमधील आठही प्रवासी सुरखरु

Goa Accident

गोव्याचे माजी रणजी कर्णधार सुभाष कंग्राळकर यांचे निधन

Ranji Cricket Goa

रणजी क्रिकेट स्पर्धेत १९८५ साली पहिला सामना खेळलेल्या गोव्याच्या संघाचे सदस्य, माजी कर्णधार, निवड समिती सदस्य, हुकमी फलंदाज सुभाष कंग्राळकर (७१) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने बेळगाव येथे निधन झाले.

राज्यात अपघातांची मालिका सुरुच, आसगाव येथे कारचा अपघात

Goa Accident

राज्यात अपघातांची मालिका सुरुच. सोमवारी पहाटे आसगाव येथे पर्यटक जोडप्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेने येत रस्त्याशेजारच्या कुंपणाला जोरदार धडक. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, दोन्ही पर्यटक सुरक्षित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT