नॅन्सी डायस (६२, रा. कांदोळी-बार्देश) यांच्या घरातून 04 सोन्याच्या प्लेटची चोरी. संशयित नोकर याकुब मोंडल (रा. पश्चिम बंगाल) याला कळंगुट पोलिसांकडून अटक. याकुबकडून 300 ग्रॅम वजनाची 25 लाख किंमतीची 3 सोन्याची बिस्किटे जप्त.
चिखली आणि आसोय डोंगरी भागात उद्या (15 मे) सकाळी 09 ते दुपारी 01 वाजेपर्यंत (चार तास) वीज पुरवठा खंडित राहणार. 11 केव्ही वास्को-2 फीडरवर तातडीच्या दुरुस्ती कामानिमित्त वीज पुरवठा बंद केला जाणार आहे.
मामलेदार कार्यालय, वाळपई येथे झाड कोसळल्याने बाईक, कारचे नुकसान. झाडाखाली दोन चारचाकी अडकून पडल्याची माहिती. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी, मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरु.
पणजी मार्केटमधील विक्रेत्यांनी २००३ पासून थकबाकी जमा केलेली नाही. कोणत्याही प्रक्रियेचा पालन न करता २०१६ मध्ये कर वाढविण्यात आला. आम्ही कर कपता करण्याचा विचार करत आहोत.
विक्रेत्यांसोबत करार केला जाईल आणि दर ठरवले जातील. पालिकेला सुमारे नऊ कोटी रुपये कर स्वरुपात मिळतील, असे मोन्सेरात म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्नीसह मंगळवारी घेतले शिरगावच्या श्री लईराई देवीचे दर्शन. समस्त जनतेचे कल्याण करण्याची देवीचरणी मागणी.
दहावी बोर्ड परीक्षेचा उद्या (१५ मे) निकाल जाहीर केला जाणार आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येईल.
मडगाव येथे बूट या चपलांच्या दुकानाला आग लागल्याची घटना आज (मंगळवारी) उघडकीस आली. अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझविण्यात यश आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.