नुवें मतदारसंघातील मतदारांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची भेट घेऊन वेर्णा येथील प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत त्यांच्या समस्या मांडल्या. येत्या विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरण्याचे आश्वासन विरोधी पक्षनेत्यांनी दिले आहे.
सरकारने स्थानिक लोकांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत आणि प्रकल्पांची सक्ती करु नये, असे युरी आलेमाव यांनी म्हटले.
दक्षिण गोव्यात सनबर्नचे आयोजन होणार हे सरकारने सोडलेले पिल्लू. दक्षिणेत होणाऱ्या विरोधाचा दाखला देत भाजप सरकारला उत्तर गोव्यातच सनबर्नचे आयोजन करायचे आहे. विजय सरदेसाईंचा दावा,
गोव्यात सरकारची आणि मंत्र्यांची फक्त 'मनी की बात' चालू आहे. वरपासून ते खालीपर्यंत फक्त कमीशनचा कारभार. गोव्यातील भ्रष्टाचाराला दिल्ली भाजपचा वरदहस्त. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाईंचा आरोप.
चोर्ला घाटा झाड कोसळल्याने बराच काळ वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड बाजुला हटवून वाहतूक सुरळीत केली.
उत्तरेत होत असलेल्या सनबर्नमुळे निर्माण झालेल्या परिणामांच्या आम्हाला जाणीव आहे. दक्षिण गोव्यात आम्हाला त्याच गोष्टी नको आहेत. स्थळ अद्याप निश्चित नसले तरी वेर्णा IDC किंवा बेतूलमध्ये सनबर्न होण्याची शक्यता आहे. दक्षिणेत आम्ही सनबर्न होऊ देणार नाही. माझ्यासह सर्व सामाजिक कार्यकर्ते त्याला विरोध करतील.- क्रूझ सिल्वा, वेळ्ळीचे आमदार
माडाचे झाड कोसळून दुचाकी चालक महिला जखमी. बाणावली ते मडगाव प्रवास करत असताना मारिया हॉलजवळ घडली घटना. महिलेला उपचारासाठी दक्षिण गोवा रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे.
भाड्याच्या वादातून महिला प्रवाशाला मारहाण केल्याप्रकरणी टॅक्सी चालक शब्बीर सुबनी सुनादी (38, सुरावली, सासष्टी) याला हणजूण पोलिसांकडून अटक. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सीआरपीसीच्या कलम 151 अंतर्गत चालकाला अटक करण्यात आलीय. पोलिस अधिक तपास करतायेत.
राज्यात आजपासून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून 'ऑरेंज अलर्ट' जारी.
बार्देश आणि डिचोली तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातील ३० एमएलडी प्लांटला जोडणाऱ्या वीज ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
गुजरातमध्ये चांगला विकास झालाय, तिथे सनबर्न हलविण्यात यावा. सनबर्न महोत्सवाला विरोध करणारा ठराव सर्व पंचायतींनी संमत करावा, अशी मागणी वकील राधाराव ग्रेसियस यांनी केली आहे.
ना दक्षिण ना उत्तर आम्हाला सनबर्न गोव्यातच नकोय. आम्हाला ड्रग पेडलर, वेश्या व्यवसाय नकोय. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अगोदर कोलमडली आहे. सनबर्नला रोका, आम्हाला विरोध करतोय, असे बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस म्हणाले.
क्रुझवाडो, साळगाव येथे घराची भिंत कोसळून दीड लाखांचे नुकसान. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
रस्ता क्रॉस करताना बसच्या धडकेत महिला ठार. स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ मडगाव येथे झाला अपघात.
पंढरपूर अपघातप्रकरणी हैद्राबादच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. हर्षित परेड्डी (रा. हैद्राबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी झालेल्या अपघातात गौरी कुडतरकरचा मृत्यू झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.