Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Goa Todays Live Update News: पावसाळी अधिवेशनासाठी नागरिकांकडून सरदेसाईंनी मागवल्या सूचना

गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी आगामी पावसाळी अधिवेशनासाठी नागरिकांडून सूचना मागवल्या आहेत.

Manish Jadhav

पावसाळी अधिवेशनासाठी नागरिकांकडून सरदेसाईंनी मागवल्या सूचना

गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी आगामी पावसाळी अधिवेशनासाठी नागरिकांडून सूचना मागवल्या आहेत. भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर फेल ठरल्याचे सरदेसाई म्हणाले. अधिवेशनादरम्यान आम्ही विधानसभेत सरकारच्या चुकीच्या कामांचा आम्ही पर्दाफाश करु. नागरिक आपल्या सूचना publicsuggestions@goaforward.in. या ईमेलवर पाठवू शकतात. नागरिक 5 जुलै 2024 पर्यंत सूचना पाठवू शकतात, असे गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी सांगितले.

Vijai Sardesai

श्रेया धारगळकरला म्हापसा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

श्रेया धारगळकरला म्हापसा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने काही अटी आणि शर्तींसह 50,000 च्या जातमुचलक्यासह जामीन मंजूर केला.

Shreya Dhargalkar

म्हापसातील पावलो हाऊसजवळील इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मरला आग; जीवीतहानी टळली!

सोमवारी म्हापसा येथील सिव्हिल कोर्ट रोडजवळ असलेल्या पावलो हाऊसजवळील इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मरला आग लागली. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ आग आटोक्यात आणली. विद्युत विभागाचे लाईनमन सध्या दुरुस्तीचे काम करत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

आसगाव-बार्देश येथे चारचाकी जळून खाक; आगीचे कारण अस्पष्ट; पाच लाखांच्या नुकसानीचा अंदाज

आसगाव-बार्देश येथे चारचाकी कार जळून खाक झाली. या घटनेत तब्बल पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. चारचाकी कारला कोणी आग लावली हे अद्याप स्पष्ट नाही. यासंबंधीचा तपास सुरु आहे.

बेतोड्यात चोरी; पंचायत क्षेत्रात पोलिस गस्त वाढवण्याची सरपंचांकडून मागणी

बेतोडा पंचायत क्षेत्रातील शिगनेव्हाळ गावात नारायण गावडे यांच्या घरी मोठी चोरी झाली. चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाट फोडून दागिने आणि तब्बल 60 हजारांची रोकड लंपास केली. या भागात बिगर गोमंतकीयांचा संचार वाढल्याने पोलिस गस्त वाढवण्याची मागणी बेतोड्याचे सरपंच मधु खांडेपारकर यांनी केली आहे.

Sarpanch Madhu Khandeparkar

‘स्मार्ट सिटीच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाबाबत कंत्राटदाराविरोधात तक्रार करा’- सरदेसाई भडकले

पणजी शहरामध्ये स्मार्ट सिटीसंदर्भात सुरु असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत पोलिसांत जबाबदार कंत्राटदाराविरोधात तक्रार (एफआयएर) दाखल करा. नव्याने बांधकाम केलेले क्राँक्रिटची कामे अनेक ठिकाणी कोसळत असल्याने स्मार्ट सिटी कामाचे ऑडिट आणि चौकशी करण्याची मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

Vijay Sardesai

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT