Animal Husbandry Minister Nilkanth Halarnkar DIP
गोवा

Goa Top News: मंत्री हळर्णकरांच्या अंगावर धावून गेला दिल्लीकर, पूजाचा जामीन फेटाळला; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today's 10 July 2024 Breaking News: गोव्यातील मॉन्सून, हवामान, क्रीडा, कला संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी.

Pramod Yadav

Minister Nilkanth Halarnkar: मत्स्य खात्याच्या मंत्र्यांच्या अंगावर धावून गेला दिल्लीचा एजंट

मत्स्य मंत्री नीलकंठ हळर्णकर यांना अपशब्द वापरून त्यांच्या अंगावर धाव घेतल्याप्रकरणी व अंगरक्षक तसेच चालकास शिवीगाळ केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी दिल्ली येथील गौरव बक्षी जमीन एजंटला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास कोलवाळ पोलीस करीत आहे.

कला अकादमीची साऊंड सिस्टम कालबाह्य आणि सुमार दर्जाची! 'साऊंड मॅन ऑफ इंडीया'ची खंत

कोट्यावधी रुपये खर्चून दुरुस्त केलेल्या कला अकादमीची नवी साऊंड सिस्टम कालबाह्य आणि सुमार दर्जाची. 2003साली कला अकादमीत साऊंड सिस्टम घातलेल्या 'साऊंड मॅन ऑफ इंडिया' रॉजर ड्रॅगो यांनी स्वता नव्या कला अकादमीच्या साऊंड सिस्टमची पहाणी केल्यानंतर व्यक्त केली खंत.

Goa Assembly Session: खाजगी सदस्य ठरावाच्या पहिल्या फेरीत युरीनी "ओपिनियन पोल दिवस" आणि एल्टनने "एसटी राजकीय आरक्षण" निवडले

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या “ओपिनियन पोल दिवस” आणि केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता यांच्या "अनुसूचित जमातींसाठी राजकीय आरक्षण" ह्या खाजगी सदस्यांच्या ठरावासाठी निवड क्रमांकात अनुक्रमे तिसरे व पहिले स्थान मिळाले आहे. खाजगी सदस्यांचे ठराव शुक्रवार, 19 जुलै 2024 रोजी चर्चेसाठी येतील.

Konkan Railway: मडगावला येणारी ट्रेन सावंतवाडीत थांबली, प्रवाशांना बसने सोडले

मंगळुरु ट्रेन क्रमांक 12619 सावंतवाडी स्थानकावर थांबवून प्रवाशांना बसद्वारे मडगावमध्ये आणण्यात आले. मडगाव स्थानकावरून 3:30 वाजता प्रवासी ट्रेनद्वारे प्रवाशांना मंगळुरुला नेण्यात आले. कोकण रेल्वेचे उपसरव्यवस्थापक बबन घाटगे यांची माहिती.

अभिमानास्पद ! UNESCO बैठकीत सागर नाईक मुळे दर्शवणार कावी कला

गोमंतकीय कावी आर्ट कलाकार सागर नाईक मुळेने पुन्हा उंचावली गोमंतकीयांची मान. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समिती (UNESCO) बैठकीत होणार सहभागी. केंद्रीय वस्त्र मंत्रालयाकडून सागरला आमंत्रण. 21 जुलै ते 31 जुलै बैठकीचे आयोजन.

Kala Academy: कला अकादमीच्या कामाची HCच्या निवृत्त न्यायाधीशांखाली चौकशी करा व श्वेतपत्रिकेच्या मागणीवर ठाम - आलेमाव

कला अकादमीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, कला आणि संस्कृती खात्याचे अधिकारी आणि कलाकार तसेच ध्वनी, प्रकाशयोजना आणि स्थापत्यशास्त्रातील तज्ज्ञांसमवेत केलेल्या पाहणीचा अनुभव भयानक होता.

मी सविस्तर अहवाल तयार करत असून तो मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर करुन त्यावर कालबद्ध कारवाई करण्याची मागणी करणार आहे असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

Assagao House Demolition: आसगाव घर मोडतोड प्रकरण; पूजा शर्माचा जामीन अर्ज फेटाळला

आसगाव घर मोडतोड प्रकरणी मुख्य संशयित पूजा शर्माचा जामीन अर्ज पणजी सत्र न्यायालयाने फेटाळला.

Konkani Language: कोकणी रोमन लिपीसाठी लढा देणार, ग्लोबल कोकणी फोरम

कोकणी रोमन लिपीसाठी लढा देणार, ग्लोबल कोकणी फोरमच्या वतीने फ्लोरीयानो वाझ यांच्या पुतळ्यासमोर शपथ. रोमन ऐवजी देवनागरी लिपी देऊन सरकारने कॅथलिक समाजावर मोठा अन्याय केल्याचा आरोप केनेडी अफोन्सो यांनी केला.

Salary Hike: सरपंच, उपसरपंचासह पंच सदस्यांच्या वेतनात दोन हजाराने वाढ

गोवा सरकारने सरपंच, उपसरपंचासह पंच सदस्यांच्या वेतनात दोन हजाराने वाढ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. सरपंच ८,०००, उपसरपंचांना ६,५०० तर पंच सदस्यांना ५,५०० वेतन मिळणार आहे.

दिगंबर कामत यांच्याशी देव बोलू लागलाय - विजय सरदेसाई

दिगंबर कामत यांच्याशी देव बोलू लागलाय. म्हणूनच कदाचित त्यांना देवाकडून दुसऱ्यांना पडणारी स्वप्ने कळू लागलीत. विजय सरदेसाई यांनी साधला दिगंबर कामत यांच्यावर निशाणा.

Konkan Railway: कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प; अनेक गाड्या रद्द

कोकण रेल्वे‌ मार्गावरील मालपे येथील बोगद्यात चिखलमिश्रित पाणी भरल्याने उत्तररात्री 3 वाजल्यापासून कोकण रेल्वे वाहतूक ठप्प. अनेक गाड्या रद्द तर काही इतर मार्गाने वळवल्या. कोकण रेल्वेचे उपसरव्यवस्थापक बबन घाटगे यांची माहिती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT