Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Todays Live Update: कला अकादमी भ्रष्टाचाराचे स्मारक; काँग्रेसचा घणाघात

कला अकादमी भ्रष्टाचाराचे स्मारक बनले आहे. नूतनीकरणाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली.

Manish Jadhav

कला अकादमी भ्रष्टाचाराचे स्मारक; काँग्रेसचा घणाघात

कला अकादमी भ्रष्टाचाराचे स्मारक बनले आहे. नूतनीकरणाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. सरकारने यासंबंधी तात्काळ श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

Yuri Alemao

डिचोलीत 'वेदांता'च्या खनिज वाहतुकीला एकदाची सुरवात

डिचोलीत 'वेदांता'च्या खनिज वाहतुकीला एकदाची सुरवात झाली. 'एनएसपी' प्लांट ते सारमानस जेटीपर्यंत वाहतूक. पिळगावच्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय स्थगित केल्यानंतर वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला.

डिचोलीत 'वेदांता'च्या खनिज वाहतुकीला एकदाची सुरवात

आमठाणे धरण भरता भरेना..!

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार सरी बरतायेत. परंतु डिचोली तालुक्यातील आमठाणे धरण अजूनही पूर्ण भरेना. सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडूनसुद्धा धरणातील जलसाठ्याची पातळी अजूनही क्षमतेपर्यंत पोहोचलेली नाही. सध्या धरणात 48.60 मीटर एवढा जलसाठा आहे.

Amthane Dam

प्रवाहाच्या पाहणीमुळे कर्नाटकाचे पितळ उघडे पडेल!

म्हादईसंदर्भात कर्नाटकात झालेले आंदोलन म्हणजे म्हादई बाबतीत आमची भूमिका योग्य असल्याचा पुरावा. प्रवाहाच्या पाहणीमुळे कर्नाटकाचे पितळ उघडे पडेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

CM Pramod Sawant

सत्ताधारी आमदारांचाही सरकारला सवाल: युरी आलेमाव

40 आमदारांपैकी 12 मंत्री आणि 1 सभापती आहेत. 7 विरोधी आमदारांसोबत, सरकारबरोबर असलेले 20 आमदारही विधानसभेत प्रश्न मांडून सरकारला जाब विचारत आहेत. यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा कारभार पूर्णपणे कोलमडला असल्याचे स्पष्ट होते - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

Yuri Alemao

मालपे न्हंयबाग येथे राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा कोसळली दरड!

राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. यातच, मालपे न्हंयबाग येथे राष्ट्रीय महामार्ग 66 वर पुन्हा भलीमोठी दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

National Highway 66

डिचोलीत बिबट्याची दहशत..!

डिचोलीतील धबधबा परिसरातील लोकवस्तीत बिबट्या संचार करताना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, संचार करताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. बिबट्याच्या वावरामुळे नागरिक भयग्रस्त आहेत. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याकडून सापळा रचण्यात आला.

Leopard

प्रवाहच्या पाहणीचा गोव्याला शून्य फायदा!

म्हादईच्या पाण्यासाठी कर्नाटकात सर्वजण एकजूटीने लढा देत आहेत. मात्र गोव्यात या एकजुटीचा अभाव दिसून येतो. 'प्रवाह'च्या संयुक्त पाहणीचा काहीच फायदा होणार नाही. बेळगावातील निषेधावर बोलताना आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

MLA Vijay Sardesai

मोपावरील विमाने थेट बंगळूरात, मायकल मांडणार लक्षवेधी

व्हिजीब्लिटीच्या कारणामुळे मोपावरील विमाने दाबोळीऐवजी बंगळूरात उतरवण्याचे प्रकार वाढले. आपल्यालाही काही दिवसांपूर्वी असाच अनुभव आला. तिसऱ्या एटेंममध्ये विमान मोपावर उतरले. यावर विधानसभेत लक्षवेधी मांडणार, अशी माहिती आमदार मायकल‌ लोबो यांनी दिली.

MLA Michael Lobo

मोपावर 'ही' महत्वाची सुविधा नाही!

मंगळवारी सकाळी पावसाच्या व्यत्ययामुळे मोपावरील विमान बंगळूरात उतरवले. मोपावर इंस्ट्रूमेंट लॅण्डींग सर्व्हिस अनुपलब्ध. कतार एयरलाईन्सच्या पायलटकडून दुजोरा.

mopa airport

प्रवासी संतप्त! मोपावरील विमान उतरवले बंगळूरात

आज सकाळी मोपा विमानतळावर उतरणारे कतार फ्लाईट QR522 विमान पावसाच्या व्यत्ययामुळे थेट बंगळूरात उतरवले. दाबोळीजवळ असताना बंगळूरात का? असा संतप्त सवाल प्रवाशांनी यावेळी विचारला.

Qatar Flight QR522

गोव्यात पुढील 1-3 तासात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी पुढील 1-3 तासात 40-50 किमी प्रतितास वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता.

Rain Update

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अंदमानमध्ये भारतीय तटरक्षक दलाकडून तब्बल 5 टन अमलीपदार्थ जप्त

Ranbir Kapoor at IFFI 2024: आलियाने विचारलं" किशोर कुमार कोण आहे?" रणबीरने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा; Video Viral, चाहते नाराज

Corgao: सरपंच निवड हा पंचायतीचा विषय! कोरगाववासीय नाईक यांच्या पाठीशी; धार्मिक वादाला विरोध

Her Story Her Screen महिला सबलीकरणाला समर्पित! IFFI चे सकारात्मक पाऊल

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

SCROLL FOR NEXT