केंद्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांऐवजी उद्या शनिवारी देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भाजपच्या नव्या कार्यालयाची संध्याकाळी ४ वाजता पायाभरणी. नड्डांना दिल्लीत महत्वाच्या बैठका असल्याने कार्यक्रमात बदल.
बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांच्याकडून बाणावलीत महिला सुरक्षा संवाद. महिलांकडून अश्लिल व्हिडिओ साइट्सवर बंदी घालण्याची मागणी. व्हिएगस यांच्याकडून याबाबत मुख्यमंत्री आणि डीजीपींना निवेदन देण्याचे आश्वासन.
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची अकारण बदनामी खपवून घेणार नाही. भाजप मंडळ आणि समर्थक कार्यकर्त्यांचा पत्रकार परिषदेत इशारा. प्रत्येक विकासकामात खो घालण्याचा प्रयत्न करू नये. नाव न घेता काँग्रेसचे मेघ:श्याम राऊत यांचा तीव्र निषेध.
मुख्यमंत्र्यांनी २५ ऐवजी फक्त १० जणांनाच भेटण्यास तयारी दाखविल्याने टॅक्सी आंदोलक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीविना गेले माघारी.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक 2 सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 11.45 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत.
पेडणेतील टॅक्सी आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित.त्यांनी पाहिजे तर आपला नवीन अॅप काढावे. मला टार्गेट करण्याचा प्रयत्न. अनेकांना आमदार होण्याची स्वप्ने पडत आहेत. पेडणेतील टॅक्सी आंदोलनावर मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया.
आंदोलक टॅक्सीवाल्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांकडे नाही. पोटल्या आणि भ्रष्टाचार करायला त्यांना जमतं. सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणून जगात ते प्रसिद्ध. १२ वाजून गेले. आम्ही मुख्यमंत्र्यांना आणखीन अर्धा तास देतो. आंदोलक टॅक्सीवाल्यांचा मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम.
कळंगुट येथे डायोडिता फर्नांडिस (६४, म्हापसा) या वृद्भ महिलेचा मृतदेह आढळला आहे. महिलेच्या मृत्यूचे गूढ अद्याप उघडलेले नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरु आहे.
जर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत खरे लोकनेते असतील तर ते आज (शुक्रवारी) पेडण्यात आंदोलक टॅक्सीवाल्यांची भेट घेण्यास पेडण्यात येतील. मांद्रेचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच ॲड. अमित सावंतांचे वक्तव्य. मुख्यमंत्री पेडण्यात जाण्याची शक्यता कमी असल्याची सुत्रांची माहिती.
म्हापसा येथील कॅनरा बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने संशयित चोराने तेथील साउंड बॉक्स चोरून नेला होता. तसेच दुसऱ्या चोरीच्या घटनेत नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर यांच्या मालकीच्या बार अँड रेस्टॉरंटमध्ये झाली होती चोरी. या दोन्ही चोऱ्यामध्ये एकाच संशयिताचा हात. म्हापसा पोलिसांकडून अनुप केकन (32) याला अटक.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.