FC Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: एफसी गोवा सहाव्यांदा अपराजित! बंगळुरुविरोधातील सामना बरोबरीत सुटला; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa News: सनबर्न, सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हल, सुलेमान खानचे पलायन, यासह राज्यातील गुन्हे, राजकारण, पर्यटन क्षेत्रातील ठळक बातम्या.

Pramod Yadav

एफसी गोवा सहाव्यांदा अपराजित; बंगळुरुविरोधातील सामना बरोबरीत सुटला!

इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा आणि बेंगळुरु एफसी यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. एफसी गोवा सलग 6 व्यां दा सामन्यात अपराजित, 4 विजय आणि 2 अनिर्णित.

Goa Cabinet Reshuffle: गोवा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? BJP प्रदेशाध्यक्ष म्हणतात, 'होईल कधीतरी'

गोवा मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चांना उधाण आले आहे. विस्तार लवकरच होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष मात्र विस्ताराबाबत चर्चांचे खंडन केले. होईल कधीतरी म्हणत प्रदेशाध्यक्षकांना यावर सविस्तर भाष्य करण्याचे टाळले.

पुरावा म्हणून पठ्याने पणजी पोलिस स्थानकात हजर केली म्हैस!

ताळगाव येथील पिकांची भटक्या गुरांमुळे वारंवार नासाडी होत आहे. एका तरुण शेतकऱ्याने पुरावा म्हणून थेट म्हशीलाच पोलिस स्थानकात आणले. या प्रकरणात त्वरित लक्ष देण्याची शेतकऱ्याची पोलिसांकडे मागणी.

डिचोली पालिकेच्या नगराध्यक्षपदी कुंदन फळारी कायम !

डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव बारगळणार. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, भाजप मंडळ समिती व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व मतभेद दूर करण्यात यश. १७ रोजीच्या बैठकीला कोणीही उपस्थित राहणार नसल्याने अविश्वास ठराव बारगळणार. - मुख्यमंत्री.

नोकरी घोटाळा प्रकरण; आपकडून श्वेतपत्रिकेची मागणी

गोवा शिपयार्ड मधील नोकरी घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाने श्वेतपत्रिकेची मागणी केलीय. खासगी आणि सरकारी नोकरीच्या नावाने झालेल्या घोटळ्याप्रकरणी आपने चौकशीची मागणी करताना भ्रष्टाचार आणि लाच घेतल्याचे आरोप केले आहेत.

डायलिसीस युनीट सुरू करावे लागणे चिंताजनक बाब

गोव्यात सुमारे २५० डायलिसिस युनिट असणे हि चिंताजनक बाब. आपल्यावर डायलिसीसची पाळी येऊ नये यासाठी आपले आरोग्य सांभाळा. डायलिसिस केंद्रे सुरू करावी लागतात हि मनाला न पटणारे - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. साखळीत डायलिसीस केंद्राचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उदघाटन.

साठ फूट खोल विहिरीत अडकलेल्या अजगराला जीवदान, तीन तास सुरु होते रेस्क्यू ऑपरेशन

अस्नोडा डोंगरी येथे साठ फूट खोल विहिरीत अडकलेल्या अजगराला वनविभागाच्या कर्मचाऱ्याने जीवदान दिले. सुमारे तीन तास वन विभाग आणि अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. रुद्राजी तंगसाळी यांच्या मालमत्तेत असणाऱ्या विहिरीत ही घटना घडली.

मडगाव बायपास ते कुंकळ्ळी 7.24 KM रस्त्यासाठी 747 कोटी मंजूर

मडगाव बायपास ते कुंकळीदरम्यानच्या ७.२४ किलोमीटर रस्त्यासाठी केंद्राकडून ७४७ कोटी रुपये मंजूर. यामध्ये ४.४५ कि.मि. लांबीच्या सहापदरी फ्लायओव्हरचाही समावेश. खासदार सदानंद शेट तानावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नितिन गडकरी यांचे आभार मानले.

फातोर्डा येथील फ्लॅटला रात्रीच्या सुमारास आग

फातोर्डा येथील एका इमारतीतील फ्लॅटला रात्रीच्या सुमारास आग लागली. मडगाव अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. घरातील साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT