Goa Marathi Breaking News Dainik Gomantak
गोवा

Goa News: उसगाव येथील गोवा डेअरीचा पशु खाद्य प्रकल्प गेल्या दोन वर्षापासून बंद

Goa Today's 31 May 2025 Breaking News: गोव्यातील राजकारण, पर्यटन, गुन्हे, कला- क्रिडा - संस्कृती यासह विविध क्षेत्रातील ठळक बातम्या.

Pramod Yadav

उसगाव येथील गोवा डेअरीचा पशु खाद्य प्रकल्प गेल्या दोन वर्षापासून बंद

उसगाव येथील गोवा डेअरीचा पशु खाद्य प्रकल्प गेल्या दोन वर्षापासून बंद. प्रकल्पातील कामगारांना यापूर्वीच गोवा डेअरी मध्ये स्थलांतर. प्रकल्पाची स्थिती संजीवनीच्या दिशेने? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पशुपालन खात्याकडे सध्या बंद प्रकल्पाचा ताबा.

सर्व ग्राहकांना २८ नोव्हेंबरपर्यंत घरातील वीज मीटर बाहेरील ठिकाणी हलवण्याचे आदेश

गोवा वीज विभागाने एक सार्वजनिक सूचना जारी केली आहे ज्यामध्ये सर्व ग्राहकांना २८ नोव्हेंबरपर्यंत घरातील वीज मीटर बाहेरील ठिकाणी हलवण्यास सांगितले आहे अन्यथा वीज खंडित होण्यास सामोरे जावे लागेल.

हडफडे बीच गमावतोय आकर्षण

गोव्यातील हडफडे बीच, सुरु असलेल्या गैरवर्तनामुळे त्याचे आकर्षण गमावत आहे. गोव्याच्या चैतन्यशील समुद्रकिनाऱ्यांकडे आणि संस्कृतीकडे आकर्षित झालेल्या परदेशी पर्यटकांना त्रास दिला जात आहे

काणकोणात वेगळ्या राजकारणाची नांदी? 'ह्या' समाजाकडून भाजपला थेट इशारा

२०२७मध्ये जर गोमंतक क्षत्रीय मराठा समाजाच्या उमेदवाराला भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास वेगळा विचार करू. आमची आतापासूनच अंतर्गत रणनिती सुरू. आमच्या समाजाची पाच ते साडेपाच हजार मते काणकोणात आहेत आणि अनेक पात्र उमेदवारही आहेत. गावडोंगरीचे सरपंच धिल्लन देसाईंचा जाहीर इशारा.

बीसीसीआय जीसीएशी समन्वय साधून लाईव्ह करेल स्क्रीनिंग

बीसीसीआय जीसीएशी समन्वय साधून लाईव्ह स्क्रीनिंग करेल. उर्वरित लाईव्ह स्क्रीनिंग कुडचडे येथील जी सुधा मार्केटमध्ये होईल.

साखळी नगरपालिकेतर्फे जुनी पाठ्यपुस्तके नगरपालिकेत आणून देण्याच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद

साखळी नगरपालिकेतर्फे नगराध्यक्षा सिध्दी प्रभू यांनी विद्यार्थी व पालकांना जुनी पाठ्यपुस्तके नगरपालिकेत आणून देण्याच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद. आपले शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाचवी ते पदवीपर्यंतची पाठ्यपुस्तके साखळी नगरपालिकेच्या वाचनालयात जमा करण्यात येत असून हि पुस्तके साखळी व परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांनी आतापर्यंत नेली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालयासाठी केंद्र सरकारने १७९ कोटी आणि राज्य सरकारने २८ कोटी रुपये मंजूर

भारत सरकारच्या एससीआय प्रकल्पांतर्गत फर्मागुडी फोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालय उभारण्याची घोषणा पर्यटन मंत्री रोहन खावंटे यांनी केली. यासाठी केंद्र सरकारने १७९ कोटी आणि राज्य सरकारने २८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. एकूण १२५.५९ कोटी रुपयांचा हा प्रकल्प मार्च-एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होईल.

सत्तरी तालुक्यातील सर्व धबधब्यांवर जाण्यास बंदी

सत्तरी तालुक्यातील सर्व धबधब्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी सूचना वन खात्याने दिली आहे.

Goa Crime: महिलेला अश्लील संदेश पाठवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाविरोधात गुन्हा

महिलेला अश्लील संदेश पाठवणाऱ्या ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित नागरिक पेडण्याचा रहिवासी आहे. याप्रकरणी फोंडा येथील महिलेने तक्रार दाखल केली आहे. २०२१ ते जानेवारी २०२५ या काळात ही घटना घडली.

19 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; बापाची निर्दोष मुक्तता

19 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपातून बापाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुरेशा पुराव्यांअभावी त्याची मुक्तता करण्यात आली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात (पोक्सो) या खटला सुरु होता.

कपिलेश्वरी येथील नाल्यात आढळला मृतदेह

कपिलेश्वरी येथील नाल्यात आढळलेला मृतदेह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी काढला बाहेर. मृतदेह शेखर केशव नाईक (६०, वेळप- कपिलेश्वरी) यांचा असल्याचे स्पष्ट. शुक्रवारी रात्री पासून होता बेपत्ता.

काजीवाडा - फोंडा येथील रस्त्याच्या बाजूला असलेली दुकाने हटविण्यास सुरुवात.

काजीवाडा - फोंडा येथील रस्त्याच्या बाजूला असलेली ८ दुकाने उच्च न्यायालयच्या आदेशानुसार, कडक पोलीस बंदोबस्तात हटविण्यास सुरुवात.

बोरीत गॅरेजच्या छप्परावरून कोसळलेल्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

बोरी येथे गॅरेजची दुरुस्ती करताना छप्परावरून पडून जखमी झालेल्या वसंत विष्णू नाईक (६६) यांचा गोमेकॉत उपचारा दरम्यान मृत्यू. शुक्रवारी संध्याकाळी घडली घटना.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Taxi Fire: पर्वरीत टुरिस्ट टॅक्सीनं घेतला पेट! पोलिस अन् स्थानिकांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Tridashanka Yoga 2026: 26 जानेवारीला आकाशात मोठा चमत्कार! बुध-अरुणचा 'त्रिदशांक योग' पालटणार 'या' 4 राशींचं नशीब; सोमवार ठरणार भाग्याचा

Shri Shantadurga Jatra: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे..

टेक्नॉलॉजीचा गैरवापर की अश्लीलतेची फॅक्टरी? एलन मस्कचा 'Grok AI' वादाच्या भोवऱ्यात; 11 दिवसांत बनवले 30 लाख आक्षेपार्ह फोटो

प्रेमाचा सापळा आणि मृत्यूचा खेळ! एकाच कुटुंबातील चौघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा; इभ्रतीसाठी क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्यांना दणका

SCROLL FOR NEXT