Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

'मी वकील, मूर्खपणाची चूक कधीच करु शकत नाही', भूमिगत झालेले पालेकर थेट आले माध्यमांसमोर; गोव्यातील ठळक बातम्या

Pramod Yadav

न्यायालयावर माझा विश्वास, जामीनाच्या कोणत्याही अटीचा भंग केलेला नाही; अमित पालेकर

मी काहीही चुकीचे केले नसल्याने माझा न्यायालयावर विश्वास होता. मी जामीनाच्या कोणत्याही अटीचा भंग केलेला नाही. जामीन अटीचे उल्लंघन मी केले नाही वकील असल्याने अशी मूर्खपणाची चूक मी कधीही करू शकत नाही :अमित पालेकर

नाणूस फिडरवर २९ रोजी वीज खंडित

गुरुवार दि.२९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ यावेळेत ११ केव्ही नाणूस फिडरवर ११ केव्ही वीज वाहिन्यांच्या देखभालीचे काम करायचे असल्याने तसेच एबी स्विच दुरुस्ती करायची असल्याने वेळगे ग्रामपंचायत क्षेत्रात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.यावेळी ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील 15 दिवसात स्मार्ट सिटी पणजीतील रस्ते होणार चकाचक

स्मार्ट सिटीतील जरुरी असलेल्या 11 पैकी 8 रस्त्यांची डागडुजी येत्या 15 दिवसात पूर्ण होणार. स्मार्ट सिटीच्या 7 रस्त्यांवर rubber souling करण्यात येणार असून 1 रस्ता काँक्रिट चा बनविण्यात आला आहे. उरलेल्या 3 रस्त्यांची कामे महानगरपालिका करणार असून त्याबाबतची माहिती गुरुवारी उच्च न्यायालयात सादर करणार आहे. जनरल देविदास पांगम यांची माहिती

डेल्टा कॉर्पचे MEGA HILL CUTTING! मंत्री राणे कारवाई करणार का?

आयपीबीअंतर्गत कसिनो आणि गेमींग झोनसाठी मान्यता घेतलेल्या Delta Corp.ltd कडून मोठ्या प्रमाणात डोंगर कापणीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचा आरोप. Partly Natural Cover, Partly Cultivable under Irrigation Command Area ह्या जमीन प्रकारात डोंगर कापणी झाल्याचा दावा. ह्यावर मंत्री राणे कारवाई करणार का?पाटकरांचा सवाल.

माळोली सत्तरी येथे घराला आग लागून सुमारे 2 लाखाचे नुकसान 

माळोली सत्तरी येथे दिगा दुकाना जवळ पपिहा देसाई यांचा घराला आग लागून सुमारे 2 लाखाचे नुकसान, वाळपई अग्नीशमन दलातर्फे मदतकार्य.

ॲड.अमित पालेकरांना हाय कोर्टाचा मोठा दिलासा

फोंडा अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून ॲड.अमित पालेकरांचा जामीन रद्दचा आदेश मुंबई खंडपीठाच्या गोवा उच्च न्यायालयाने ठरवला रद्दबातल. आता परदेशवारी करताना पालेकरांना वारंवार कोर्टाच्या परवानगीची गरज नाही.

अल शादाय चॅरिटेबल ट्रस्टच्या चाइल्ड केअर युनिटची HC कडून स्वेच्छा दखल, शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे निर्देश

आसगाव येथील बेकायेशीररित्या चालू असलेल्या अल शादाय चॅरिटेबल ट्रस्टच्या चाइल्ड केअर युनिटवर उच्च न्यायालयाने सुमोटो घेतला. बाल कल्याण समितीला उच्च न्यायालयाने आज (बुधवारी) या चाइल्ड केअर युनिट ची तपासणी करून शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली माहिती

चतुर्थी काळात डिचोली बाजारात तीन दिवस वाहनांना 'नो एन्ट्री'

चतुर्थी काळात डिचोली बाजारात तीन दिवस वाहनांना 'नो एन्ट्री'. पुढील बुधवारपासून (4 सप्टेंबर) होणार निर्णयाची कार्यवाही. वाहतूक पोलीस, अग्निशमन दल आणि व्यापारी संघटनेबरोबर बुधवारी (ता. 28) झालेल्या पालिका बैठकीत निर्णय. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय.

Goa Cabinet Decision: कॅबीनेटचे महत्वाचे निर्णय!

'Sustainable Transport System' प्रस्तावाला मान्यता. खाण खात्यात प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी Legal Officer सांची नेमणूक. Independent status for NCRT.

कासावलीतील जोसेफ फ्रान्सिस परेरांना CAA अंतर्गत  भारतीय नागरिकत्व

कासावलीतील जोसेफ फ्रान्सिस परेरांना CAA अंतर्गत मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांनी बहाल केले भारतीय नागरिकत्व. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ते शिक्षणासाठी पाकिस्तानात गेले होते व त्यांना तिथले नागरिकत्व घ्यावे लागले होते.

Goa Monsoon 2024: गोव्यात पाच दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

गोवा हवामान खात्याने राज्यात पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

FDA ची धडक कारवाई सुरुच, म्हापशात लेबल नसणारे एक लाखांचे खाद्यपदार्थ जप्त

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून म्हापसा येथील आंतरराज्य बस स्थानक येथे छापा टाकण्यात आला. अधिकाऱ्यांनी लेबल नसणारे फरसाण, बिस्किट, मांस असा एक लाख किमतीचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT