Bicholim News Dainik Gomantak
गोवा

Goa News: कुळण येथे गुलमोहराचे झाड पडल्याने रस्ता वाहतुकीस बंद; वाचा दिवसभरातील घडामोडी

गोमन्तक डिजिटल टीम

कुळण येथे गुलमोहराचे झाड पडल्याने रस्ता वाहतुकीस बंद

डिचोली ते साखळी मार्गावर कुळण येथे गुलमोहराचे झाड पडल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला. सुदैवाने त्याचवेळी रस्त्यावर वाहने नसल्याने अनर्थ टळला.

डिचोलीत मर्यादित पाणी पुरवठा!

मुख्य जलवाहिनीचे काम करायचे असल्याने १५ व १६ ऑक्टोबर दरम्यान डिचोली तालुक्यात मर्यादित पुरवठा असेल.

"घरीच दारू प्या, दारू पिऊन गाडी चालवू नका"!! मुख्यमंत्र्यांची कळकळीची विनंती

राज्यातील वाढत्या अपघातांवर बोलताना "दारू पिऊन गाडी चालवू नका, दारू प्यायची असेल तर घरीच प्या" किंवा बारमध्ये जाऊन दारू प्यायची असेल तर सोबत ड्राइव्हर ठेवा असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणालेत. इंटरस्टेट बसच्या चालकांना अल्कोमीटरचा वापर करावा लागेल आणि याबद्दलच्या सूचना आरटीओ आणि वाहतूक विभागाला दिल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

गोव्यातील अपघातात वाढ, "भिवपाची गरज आसा" : मुख्यमंत्री सावंत

गोव्यातील अपघात आणि रफ ड्रायव्हिंग पाहून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी "भिवपाची गरज आसा" असा संदेश दिला आहे. शिवाय, सुरक्षा ही केवळ विभाग आणि सरकारचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं ते म्हणालेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kadamba Transport: कदंब बससाठी गोव्यात चालक मिळेनात? कर्नाटकात झळकली जाहीरात

Yuri Alemao: भाजप सरकार अपयशी! गोव्याला दलाल संस्कृती, गुन्ह्यांचे केंद्र बनवले; आलेमाव यांचा घणाघात

Shah Rukh Khan: अखेर भेट झालीच नाही... किंग खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, मार्गदर्शक शिक्षकाचे गोव्यात निधन

Sonsodo News: सोनसडा येथील कचरा समस्‍या संपली! मडगाव नगराध्‍यक्ष शिरोडकरांचा दावा

खरी कुजबुज: युरींचे कुडतरीवर लक्ष?

SCROLL FOR NEXT