Dainik Gomantak
गोवा

Goa News: सरकारी आदेशाला केराची टोपली, पिसुर्लेत रस्त्याचे खोदकाम सुरुच; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Goa Today's News Live Update: गोव्यातील राजकारण, गुन्हे, पर्यटन, कला - क्रीडा - संस्कृती यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.

Pramod Yadav

सरकारी आदेशाला केराची टोपली, पिसुर्लेत रस्त्याचे खोदकाम सुरुच!

लवकरच पावसाला सुरुवात होणार असल्याने सार्वाजनीक बांधकाम खात्याने 15 मे पासून रस्ते खोदण्यास बंदी लागू केली आहे. असे असतानाही पिसुर्ले सत्तरीत सुरु असलेले रस्त्याचे खोदकाम सुरु आहे.

समुद्रकिनारी अनधिकृतरित्या गाडी चालवल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांची कारवाई, चालकाला घेतले ताब्यात

समुद्रकिनाऱ्यावर अनधिकृतपणे गाडी चालवल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी एका वाहन चालकावर कारवाई केली आहे. हैदराबाद येथील 27 वर्षीय चालक एस. गगनदीप सिंग असे कारवाई करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.

जूनपासून घरपट्टी भरणाऱ्यांसाठी दंडाची तरतूद शिथिल होणार, कुडचडे कॉन्सिलच्या बैठकीत ठराव मंजूर

कुडचडे येथे कॉन्सिलने त्यांच्या बैठकीत दोन महिन्यानंतर म्हणजेच जूनपासून घरपट्टी भरणाऱ्यांसाठी दंडाची तरतूद शिथिल करण्याचा ठराव मंजूर केला आहे. यासंबंधी लवकरच सरकारला कळवण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले.

सत्तरीत वादळी वाऱ्यसह पावसाची हजेरी!

राज्यात अवकाळी पावसाने धूमशान घातले आहेत. सत्तरीसह अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. सत्तरीत आता गुरुवारी (15 मे) पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.

राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी घेतले लईराई देवीचे दर्शन

राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी घेतले शिरगाव येथील लईराई देवीचे दर्शन घेतले. यावेळी जत्रेवेळी घडलेल्या दुर्घटनेबद्धल राज्यपालांनी दुःख व्यक्त केले. शिरगाव चेंगराचेंगरीप्रकरणी सत्यशोधन समितीच्या अहवालानुसार सरकारयोग्य ती कृती करेल, असे राज्यपाल यावेळी म्हणाले.

दुकळे-मोले येथील थांबवलेले हॉटमिक्स पॅचवर्क काम पुन्हा सुरु

दुकळे-मोले येथील थांबवलेले हॉटमिक्स पॅचवर्क काम अखेर पुन्हा सुरू. आमदार डॉ.गणेश गांवकरशी सरपंच सुहास गांवकर यांनी सल्लामसलत केल्यानंतर ग्रामस्थांनी अडविलेले काम पुन्हा सुरु करण्यात आले. आज ग्रामस्थ आणि आमदार यांची होणार आज बैठक.

म्हादय आमची माय, ती आमका जाय!

म्हादई नदीचे पाणी वळवण्याबाबतचा अहवाल प्रकाशित करणाऱ्या तीन एनआयओ शास्त्रज्ञांवर टीएफएमएमने टीका केली. या शास्त्रज्ञांपैकी एक डी. शंकर हे कर्नाटकचे आहेत आणि त्यांनी त्यांच्या राज्याच्या बाजूने हा अहवाल लिहिला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

 नवीन योजना लागू करा; कुंकळ्ळी खासगी बस मालक संघटनेची मागणी

कुंकळ्ळी खासगी बस मालक संघटनेने सरकारकडे सर्व मार्गांसाठी एक नवीन योजना आणण्याची मागणी केली आहे, जेणेकरून सर्व बस मालकांना या योजनेचा लाभ घेता येईल. म्हजी बस योजना आजपासून बंद करण्यात आली आहे आणि ती योजना फक्त काही मार्गांसाठी उपलब्ध होती. सरकारने नवीन योजना लागू करावी त्याचा सर्व स्थानिक बस मालकांना लाभ होईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पूर्ण रस्ता हॉटमिक्स करा! दुकळे मोले येथे रस्त्याचे पॅचवर्क थांबवले 

दुकळे मोले येथे रस्त्याचे पॅचवर्क काम ग्रामस्थांनी थांबविले.पूर्ण रस्ता हॉटमिक्स करण्याची मागणी. सरपंच सुहास गांवकर घटनास्थळी हजर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT