गोव्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण देणाऱ्या विधेयकाची मंजुरी लांबणीवर. पुढील अधिवेशनात होणार चर्चा. जागतिक आदिवासी दिनी विधेयकाला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा होती पण ते पुढे ढकलण्यात आले. खासदार विरियातोंनी व्यक्त केली नाराजी.
प्रकाश अजुर्न वेळीपांकडून स्वताच्या स्वार्थासाठी गोमन्तक गौड मराठा समाजाचा वापर. आज शुक्रवारी (9 ऑगस्ट) रोजी समाजाच्या वर्धापन दिना दिवशी 15 मिनीटात जनरल बॉडी मिटींग आटपून विद्यमान अध्यक्ष विश्वास गावडेंची पुन्हा अध्यक्ष म्हणून बेकायदेशीर नेमणूक. विरोधी गोविंद शिरोडकर गटाची टीका. पुन्हा निवडणूक न घेतल्यात कोर्टात जाण्याचाही इशारा.
राज्यातील बेकायदा डोंगर कापणीविरोधात कारवाई झाली नसल्यास आता त्यासाठी तलाठ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तलाठी याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देतील.
वाळपई सामाजिक आरोग्य केंद्राबाहेर बस शेड नसल्याने होणारी रुग्णांची परवड थांबणार.लवकरच उभे राहणार बस शेड.मंत्री विश्वजीत राणेंची माहिती. आमदार डॉ .देविया राणेंकडून प्रस्तावीत बस शेडचा नकाशा जारी.
मधलामाज, मांद्रे येथील हनुमान मंदिरातून 30 हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी विनोद रामा पाटेकर याला अटक. यापूर्वी केरी येथील आजोबा मंदिरात चोरी केल्याची आरोपीकडून कबुली.
कळंगुट येथील डेविल्स नाईट क्लबची शुक्रवारी हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे पहाणी करण्यात आली. गेल्यावर्षी पर्यटकांना लुटल्याच्या तक्रारीमुळे हा क्लब बंद करण्यात आला होता. सध्या या प्रकरणावर हायकोर्टामध्ये केस चालू आहे. पहाणीच्यावेळी तक्रारदार, मामलेदार आणि तलाठी उपस्थित होते. पुढील तपासणी सुरू आहे.
वाळपई सामाजिक आरोग्य केंद्राबाहेर रस्त्यावर उभे असलेले आणि रस्त्यावर बसलेले रुग्ण. ह्या ठीकाणी बस शेड नसल्याने रुग्णांची अशी होतेय परवड. वाळपई पालिकेचे समस्येकडे साफ दुर्लक्ष.
धारबांदोडा दोन रस्त्याच्या ठिकाणी रात्री हिट अँड रनची घटना. दुचाकीला धडक. बंगळुरु येथील दुचाकी चालक चेतन कुमार चंद्रा (२३) व पाठीमागे बसलेला संतोष नायडू (२२) जखमी. फोंडा पोलीस आज्ञात वाहनाचा घेतात शोध.
म्हापसा येथील एका शाळेच्या मालमत्तेची अनोळखी व्यक्तीकडून नासधूस. परीक्षेचे पेपरही जाळले. खिडक्यांच्या काचा, टिव्ही फोडला. संशयितांनी सीसीटीव्हीचा डिवीआर नेला पळवून. घटना सकाळी उघडकीस येताच, शालेय व्यवस्थापनाने विद्यार्थांना पाठविले घरी. म्हापसा पोलिस घटनास्थळी.
काणका, बार्देश येथील नारायण मंदिराजवळ एका पार्क टॅक्सी गाडीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. सुमारे २.५ लाख रुपयांचे नुकसान. आज पहाटे 4 वाजताची घटना.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.