Margao Dainik Gomantak
गोवा

छत्रपती संभाजी महाराज पुतळा वाद जैसे थे; गोव्यात दोन अपघात, एक ठार, महत्वाच्या ठळक बातम्या

Goa Breaking News In Marathi: गोव्यात दिवसभर घडलेल्या ठळक घडामोडींचा आढावा.

Pramod Yadav

चतुर्थी नंतर पुन्हा 'जनता दरबार'; गोवा फॉरवर्ड

18 दिवस चाललेल्या पावसाळी अधिवेशनात फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी खरी विरोधी पक्षनेत्याची भुमिका मांडली. गोव्यातील 70 टक्के प्रश्न विधानसभेत मांडल्याने जनता त्यांची आभारी आहे. अधिवेशनापुर्वी सुरू केलेला जनता दरबार चतुर्थी नंतर पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती गोवा फॉरवर्ड चे सचिव मोहनदास लोलियेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काणकोण येथे अपघात, ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

काणकोण येथे झालेल्या अपघातात ३७ वर्षीय जॉन फर्नांडिस याचा मृत्यू झाला आहे. काणकोण येथील मनोहर पर्रीकर बायपास येथे हा अपघात झाला.

छत्रपती संभाजी महाराज पुतळा; बैठकीत अखेर तोडगा निघालाच नाही

छत्रपती संभाजी महाराज पुतळा मारुती मंदिर ट्रस्टकडून इतरत्र हलविण्यासाठी प्रस्ताव संभाजी महाराज प्रेमींकडून अमान्य. मडगाव उपजिल्हाधिकारी रमेश गांवकर यांनी घेतलेल्या बैठकीत अखेर तोडगा निघालाच नाही.

Hill Cutting मुख्यमंत्री साहेब हे चाललंय काय?

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांच्या मतदारसंघात माशेल साखळी हमरस्त्याशेजारी आमोणे पुलाजवळ Hill Cutting. मुख्यमंत्र्यांचा दररोजचा रस्ता. वायनाडच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या दृष्टीने डोंगर कापणीला थारा देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले होते सभागृहात विधान.

म्हापशात युनियन फार्मसीजवळ आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतेदह

म्हापशात युनियन फार्मसीजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने गुढ अधिक वाढले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास केला जात आहे.

फातोर्ड्यात मांस चोरीचा प्रयत्न; दोघे ताब्यात, एक फरार

फातोर्ड्यात एका घरातून मांस चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, एकजण फरार झाला आहे. कुत्रे भुंकायला लागल्याने कामगार जागे झाले अन् त्यांनी दोघांना पकडले तर एक फरार झाला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे.

ओल्ड-गोवा बायपास येथे कारचा अपघात, चालक जखमी

ओल्ड-गोवा बायपास येथे कार अपघातात चालक जखमी झाला आहे. कार विद्युत खांबाला धडकल्याने झालेल्या अपघातात कारचे देखील नुकसान झाले आहे.

Goa Police: कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गेल्या 5 वर्षात एकूण 561 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गेल्या 5 वर्षात एकूण 561 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तर, 12 प्रकरणात पोलीस कर्मचारी एफआयआर नोंदविण्यात अयशस्वी ठरले.

साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सिध्दी प्रभू बिनविरोध

साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सिध्दी प्रभू यांची बिनविरोध निवड. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले अभिनंदन.

'नगरपालिका स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न करा, सरकारचे विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य आहे,' असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्त्याची अवस्था बिकट तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी

काळी नदीवरील पूल कोसळल्यानंतर गोव्यातील उद्योगपतीने अनमोड घाटातील रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले आहे. घाटातील रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी उद्योगपतींच्याकडून करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT