Goa Railway News X
गोवा

Goa Solapur Railway: विमानसेवा सुरु झाली पण रेल्वेसेवा नाही, गोवा-सोलापूर प्रश्नाचे भिजत घोंगडे; प्रशासनाकडून ठोस निर्णय नाही

Goa to Solapur Railway: दक्षिण पश्चिम रेल्वेच्या विभागीय व क्षेत्रीय प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आला होता.

Sameer Panditrao

पणजी: गोवा आणि सोलापूर यांना जोडणारी विमान सेवा लवकरच सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. त्यामुळे गोवा-सोलापूर रेल्वे सेवा कधी सुरू होणार असा प्रश्न चर्चेत आला आहे.

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या विभागीय व क्षेत्रीय प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आला होता. खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत हा विषय मांडल्याचे सांगितले होते.

मात्र अद्यापही ही रेल्वे पुन्हा सुरू झालेली नाही, यामुळे अनेकांचे नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. मोपा विमानतळावरून सोलापूरसाठी थेट विमानसेवा सुरू होण्याचा निर्णय हा दोन्ही भागांतील औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

या सेवेमुळे दोन्ही शहरांतील अंतर केवळ एक तासाच्या आत पार करता येणार असून, प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. या सेवेमुळे गोव्यातील पर्यटन व्यवसायासही चालना मिळेल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. तथापि, गोवा-सोलापूर दरम्यानची रेल्वे सेवा गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. प्रचंड मागणी असूनही या मार्गावरील गाड्या सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेलेली नाहीत.

कृती समित्यांना निवेदने

प्रवासी कृती समित्यांनी रेल्वे सेवेच्या पुनर्बहालीसाठी वेळोवेळी निवेदने सादर केली आहेत. दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनाही निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु अद्याप रेल्वे मंत्रालयाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सोलापूरसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून गोव्यात काम करणाऱ्या हजारो कामगारांसाठी रेल्वे ही स्वस्त आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था होती. आता विमानसेवा आली असली, तरी ती सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेता रेल्वे सेवा पूर्ववत करण्याची मागणी जोर धरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Bust: शिवोलीतील फुटबॉल मैदानाजवळ 7.90 लाखांचं ड्रग्ज जप्त, रत्नागिरीच्या 25 वर्षीय तरुणाला अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई!

'ऑलिम्पिकसाठी गोव्याला सज्ज करा'! रॅकेट खेळांसाठी 'उत्कृष्टता केंद्र' स्थापन करण्याची खासदार तानावडेंची राज्यसभेत मागणी

IndiGo Share Market Loss: विमानं रद्द करणं इंडिगोला पडलं महागात! एका दिवसात तब्बल 7160 कोटींचा फटका, बाजारमूल्यात मोठी घसरण

Goa Politics: 'त्या 11 जागांवर युतीची चर्चाच नव्हती', अमित पाटकरांचा 'धक्कादायक' खुलासा! काँग्रेस आणि आरजीपीमध्ये विस्फोट?

Rohit Sharma: टी-20 क्रिकेटमध्ये 'हिटमॅन'ची एन्ट्री, लवकरच मैदानात उतरणार? जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने

SCROLL FOR NEXT