Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa To London Flight: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! गोवा ते लंडन विमानसेवा सप्टेंबर अखेरपर्यंत पुन्हा सुरु होणार; पर्यटनमंत्री खवंटेंची माहिती

Goa to London-Gatwick Air India Flights: एअर इंडियाची विमानसेवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पुन्हा सुरु होईल, अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

Manish Jadhav

पणजी: अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या विमान अपघातानंतर गोवा ते लंडन (गॅटविक) (Goa to London-Gatwick) दरम्यान बंद करण्यात आलेली एअर इंडियाची (Air India) विमानसेवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पुन्हा सुरु होईल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांनी विधानसभेत बोलताना दिली.

दरम्यान, मंगळवारी (29 जुलै) विधानसभेत आपल्या विभागाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले की, गोव्याला (Goa) विविध ठिकाणांहून चांगले हवाई संपर्क (Air Connectivity) मिळणे हे राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी एक मोठा बदल ठरत आहे. गेल्या महिन्यात अहमदाबादमधून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात (Accident) झाल्यानंतर गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (Manohar International Airport) गॅटविकपर्यंतची उड्डाणे (Flights) तात्पुरती थांबवण्यात आली होती.

अहमदाबाद येथील अपघातात विमानात असलेल्या 241 प्रवाशांसह एकूण 260 लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र आता गोवा आणि गॅटविक दरम्यानची थेट विमानसेवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पुन्हा सुरु होईल.

आमदार मायकल लोबो (Michael Lobo) यांनी लंडनहून गोव्याला येणाऱ्या लोकांसाठी एअर इंडियाची ही एकमेव थेट विमानसेवा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत बोलताना सांगितले होते की, ही विमानसेवा पुन्हा सुरु करण्यासाठी ते नागरी विमान मंत्रालयाशी (Ministry of Civil Aviation) चर्चा करतील.

खंवटे यांनी मंगळवारी विधानसभेत असेही सांगितले की, 5 ऑक्टोबर 2025 पासून रशियाची (Russia) विमान कंपनी एअरोफ्लोट (Aeroflot) येकातेरिनबर्गहून (Yekaterinburg) मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आठवड्यातून तीन उड्डाणे (Three Flights a Week) सुरु करेल, ज्यात प्रत्येक विमानात 210 प्रवासी असतील. या सेवेमुळे आगामी हंगामात 13,000 हून अधिक रशियन पर्यटक (Russian Tourists) गोव्याला येण्याचा अंदाज आहे, असेही मंत्री म्हणाले. यामुळे गोव्याच्या पर्यटन उद्योगाला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: माजी पर्यटनमंत्र्यांना 13 लाखांचा गंडा, आर्थिक व्यवहारातून फसवणूक; दोघांविरोधात तक्रार नोंद

Ganesh Chaturthi: वय वर्षे 84, तरीही गणरायाची सेवा; वयाच्या 10व्या वर्षांपासून जोपासली आहे मूर्तिकलेची आवड

Goa Live News: मरड-धारबांदोडा येथील बेकायदेशीर चिरे खाणीवर छापा!

Bear Attack Quepem: चिंताजनक! अस्वलाने केला प्राणघातक हल्ला, केपेतील शेतकरी गंभीर जखमी

Goa Politics: सोमवारी होणार खातेवाटप, दामू नाईकांची स्पष्टोक्ती; अमावस्येमुळे निर्णय लांबल्याचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT