Goa State Lottery
पणजी: गोवा सरकार लवकरच पूर्णपणे हायटेक ऑनलाईन लॉटरी लॉन्च करणार आहे. पारंपरिक लॉटरी पद्धत बदलून तंत्रज्ञानावर आधारीत, अधिक पारदर्शक आणि युझर फ्रेन्डली करण्यात आली आली, असा दावा लॉटरीच्या प्रमोटर्सनी केला आहे. नव्या लॉटरी प्रणालीत ग्राहकांना ५० कोटी रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.
गोवा सरकारची ऑनलाईन लॉटरी येत्या १८ नोव्हेंबर रोजी लॉन्च केली जाणार असून, २४ नोव्हेंबर रोजी पहिला ड्रॉ काढला जाणार आहे. तंत्रज्ञानावर आधारित पूर्णपणे ऑनलाईनलॉटरी सुरु करणारे गोवा देशातील पहिले राज्य ठरले आहे.
रिती स्पोर्ट्स आणि दुसाने इन्फोटेक यांच्या वतीने संयुक्तपणे ही लॉटरी चालवली जाणार आहे. गोवा सरकारचा ऑनलाईन लॉटरीचा पर्याय फायदेशीर ठरणार आहे. सध्या देशातील १२ राज्यात कागदावर आधारित लॉटरी पद्धत पाहायला मिळते. ऑनलाईन लॉटरीचा पर्याय पूर्णपणे पेपरलेस असून, देश – विदेशातील लॉटरी प्रेमींना याचा लाभ घेता येईल.
गोवा देशातील पहिली ऑनलाईन लॉटरी लॉन्च करत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शकता यामुळे नवीन लॉटरी पद्धत अधिक विश्वासार्ह होईल, असे रिती ग्रुपचे अरुण पांडे म्हणाले.
डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे शिक्षित, अशिक्षित नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने लॉटरी घेता येईल. अधिकच्या उत्पन्नाचा पर्याय शोधणाऱ्या अनेकांना लॉटरी एक आधार वाटतो, असेही रिती स्पोर्ट्सने म्हटले आहे.
ग्रेट गोवा गेम्स खेळाडूंना एक अतुलनीय अनुभवच नव्हे तर जमा झालेल्या निधीपैकी 50 टक्के पेक्षा जास्त रक्कम बक्षीस म्हणून परत केली जाईल. यामुळे ग्राहकांचा विश्वास आणि उत्साह वाढेल. हा उपक्रम सर्वांसाठी लॉटरी सुलभ आणि फायदेशीर बनवून, नाविन्यपूर्णतेच्या माध्यमातून सामाजिक उन्नतीसाठी आमची बांधिलकी अधोरेखित करतो, असे स्पोर्ट्सने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.