Goa Illegal Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Goa to Gujarat alcohol smuggling: गुजरातमध्ये दारूबंदी असतानाही गोव्यातून बेकायदेशीररित्या दारू पुरवणाऱ्या पिसुर्लेतील एका प्रमुख डिस्टिलरीवर गुजरात पोलिसांनी कारवाई करत ती सील केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: गुजरातमध्ये दारूबंदी असतानाही गोव्यातून बेकायदेशीररित्या दारू पुरवणाऱ्या पिसुर्लेतील एका प्रमुख डिस्टिलरीवर गुजरात पोलिसांनी कारवाई करत ती सील केली आहे. याप्रकरणी एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल १.४३ कोटी रुपयांची देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

गुजरात पोलिसांनी तेथील प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात नवसारीजवळ एका कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अवैध मद्यवाहतुकीचा छडा लावल्यानंतर या तपासाला सुरुवात झाली. या प्रकरणात कार्यरत असलेले संशयित एका गुप्त नेटवर्कचा भाग असल्याचे निष्पन्न झाले असून, एका कुख्यात टोळीच्या हालचालींवरही संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तपासादरम्यान नवसारी पोलिसांनी या अवैध साठ्याचा मागोवा घेत पिसुर्ले येथील एका डिस्टिलरीपर्यंत धागा पोहोचवला. त्यानंतर गोव्याच्या अबकारी खात्याच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. नवसारीचे पोलिस अधीक्षक सुशीलकुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डिस्टिलरीत पुन्हा एकदा १.४३ कोटी रुपयांच्या मद्यसाठा सापडला आहे. हे मद्य गुजरातकडे पाठवले जाण्याच्या तयारीत होते. आम्ही डिस्टिलरी सील केली असून, एकूण ९ जणांना अटक केली आहे.’

दरम्यान, गुजरात पोलिसांनी गोवा सरकारकडे औद्योगिक युनिट्सवर अधिक कडक नजर ठेवण्याची मागणी केली आहे. या टोळक्यांनी ट्रकमधील गुप्त कप्प्यांद्वारे मद्याची वाहतूक केल्याचे समोर आले आहे.

बनावट कागदपत्रे करणाराही अटकेत

अटकेतील प्रमुख आरोपींमध्ये डिस्टिलरीचा केमिस्ट अभिजित चांगळे (२६), बनावट कागदपत्रे तयार करणारा विकास ऊर्फ विक्की बिश्नोई (३४) आणि वाहतूक व्यवस्था पाहणारा मुकेश चौधरी यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. ही कारवाई अत्यंत ऐतिहासिक आहे. दारूबंदी असलेल्या गुजरातसाठी पुरवठा करणारी डिस्टिलरी पहिल्यांदाच सील करण्यात आली आहे. ही टोळीवर मोठी धडक आहे. पोलिस आता या साखळीमागील मास्टरमाईंड आणि आर्थिक पाठबळ शोधत आहेत. हे जाळे इतर दारूबंदी असलेल्या राज्यांपर्यंत पसरले असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT