Alcohol Dainik Gomantak
गोवा

Beer दरवाढीने सरकारला 50 कोटीचा नफा अपेक्षित

मद्य किंमतीवर गोवा सरकारने विचार करावा

दैनिक गोमन्तक

गोवा सरकारने काल दिनांक 15 ऑक्टोबर रोजी बिअरवरील उत्पादन शुल्कात 10-12 रुपये प्रति बल्क लीटरने वाढ केली आहे. यामुळे गोवा सरकारला अतिरिक्त 50 कोटी रुपये मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातील मद्य विक्रेत्यांनी चिंता व्यक्त करत राज्यातील मद्याच्या (Hard Liquor) किंमतीकडे लक्ष वेधले.

(Goa to earn additional Rs 50 crore/year from hike in excise on beer)

मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी सुमारे 60 दशलक्ष बिअरची विक्री करणार्‍या गोव्यातील मद्य उद्योगाने 10-12 रुपयांची वाढ स्वीकारली आहे, परंतु पर्यटन हंगामाच्या पूर्वसंध्येला अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेल्या ( Hard liquor ) दारूच्या किमती चढ्या आहेत .असे असताना या किमती आणखी वाढणार का? अशी भिती व्यक्त केली आहे.

एका किरकोळ मद्य विक्रेत्याने विदेशी मद्याच्या किमतीही वाढवल्या जातील का? हा खरा प्रश्न आहे असे म्हटले आहे. या विक्रेत्याने स्वस्त दारुच्या दरासाठी ओळखला जाणारा गोवा आता देशातील सर्वात स्वस्त दारूचे ठिकाण राहिलेले नाही. असे नाराजीच्या स्वरात सांगितले

यावेळी काही मद्य विक्रेत्यांनी दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडमध्ये मद्याचे ( Hard liquor ) दर अधिक परवडणारे आहेत असे म्हटले. यातच महाराष्ट्र सरकारने गोव्यातून राज्यात दारू आणणाऱ्या लोकांवर गुन्हा करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे गोवा राज्यातील मद्य खरेदीवर याचा गंभीर परिणाम होईल असे ही म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT