Goa digital transformation Dainik Gomantak
गोवा

AIच्या मदतीने गोवा होणार 'स्मार्ट', बनणार देशातील सर्वात 'डिजिटल' राज्य; रोहन खवंटेंची मोठी घोषणा

AI initiative in Goa: गोवा हे देशातील 'डिजिटल' राज्य बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याची माहिती राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी दिली

Akshata Chhatre

गोवा हे देशातील 'डिजिटल' राज्य बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याची माहिती राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख बनवण्याचे राज्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणालेत.

'गोवा एआय मिशन २०२७'

गोव्याला भविष्यासाठी सज्ज आणि अधिक स्मार्ट राज्य बनवण्यासाठी 'गोवा एआय मिशन २०२७' अंतर्गत काम सुरू असल्याचे खंवटे यांनी सांगितले. 'डिजिटल टेक्नॉलॉजी कॉन्क्लेव्ह'च्या १८ व्या आवृत्तीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 'गोव्हकनेक्ट'ने गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या सहकार्याने हे संमेलन आयोजित केले होते. 'गोव्हकनेक्ट' ही एक राष्ट्रीय ज्ञान-आदानप्रदान करणारी संस्था आहे, जी डिजिटल प्रशासनावर केंद्र आणि राज्य सरकारांसोबत काम करते.

'डिजिटल इंडिया ते विकसित भारत'

कार्यक्रमाला संबोधित करताना खंवटे म्हणाले, "आज आपण 'डिजिटल इंडिया'मधून 'विकसित भारता'च्या दिशेने वाटचाल करण्याच्या आपल्या उद्दिष्टाची पुष्टी करत आहोत. एआय आणि नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने गोवा प्रशासन अधिक पारदर्शक, सर्वसमावेशक आणि लोकांच्या जवळ आणत आहे." भारत सरकारच्या डिजिटल प्रवासात गोवा एक अग्रेसर राज्य म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहे, असेही ते म्हणाले.

मंत्री खंवटे यांनी सांगितले की, 'गोवा एआय मिशन २०२७' नुसार, तंत्रज्ञानाच्या मदतीने विकासाला गती देणारे आणि प्रत्येक नागरिकाला सक्षम करणारे एक स्मार्ट व भविष्यासाठी तयार असलेले राज्य निर्माण केले जात आहे. 'प्रशासनातील एआय केवळ कार्यक्षमतेसाठी नसून, ती सर्जनशीलता, सर्वसमावेशकता आणि परिवर्तनासाठी आहे. सर्जनशीलतेच्या भावनेने गोवा या बदलाचे नेतृत्व करण्यास तयार आहे," असेही ते म्हणाले.

भविष्यातील आव्हानांवर चर्चा

'डिजिटल इंडिया ते विकसित भारत – प्रशासनाच्या परिवर्तनासाठी एक एकीकृत दृष्टी' या उद्घाटन सत्रात डिजिटल प्रशासन, सायबर सुरक्षा, अत्याधुनिक सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि नागरिकांना सेवा पुरवण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाची भूमिका यांसारख्या विषयांवर चर्चा झाली. या संमेलनाला मिझोरमचे माहिती व दळणवळण तंत्रज्ञान मंत्री वनलालथलाना, गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे ​​मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती कुमार, तसेच वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant In Mumbai: "कामगारांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासासाठी गोवा कटिबद्ध", 'OSH India 2025' मध्ये मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

SCROLL FOR NEXT