Adv Yatish Naik Dainik Gomantak
गोवा

TMC ला गोव्यात मोठा धक्का, यतीश नाईकांनी पक्षाला ठोकला रामराम

आपल्याला डावलून पक्षात नवीन आलेल्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन याद्या जाहीर होऊनही माझे नाव रोखून ठेवले आहे, असा आरोप यतीश नाईक यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, तरीही राजकीय नेत्यांच्या बेडूक उड्या चालू आहेतच. ही अत्यंत गांभीर बाब असून. TMC चे नेते अ‍ॅड यतीश नाईक यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून; पक्षाची कार्यपद्धती मला पटत नाही. एकंदरीत TMC मधील वातावरण बघता टीएमसीमध्ये राहण्याचे कोणतेही कारण नाही, अ‍ॅड यतीश नाईक यांनी स्पष्ट केले. (Goa TMC leader Ad Yatish Naik resigned from the party)

म्हणून मी निवडणूक लढणार नाही : टीएमसी नेते यतीश नाईक

तृणमूल कॉंग्रेस नेते अ‍ॅड यतीश नाईक Yatish Naik यांनी पक्षाने जाहीर केलेल्या यादीत नाव नसल्याने नाराजी व्यक्त करत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी टीएमसी (TMC) अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिले आहे. आपल्याला डावलून पक्षात नवीन आलेल्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन याद्या जाहीर होऊनही माझे नाव रोखून ठेवले आहे, असा आरोप यतीश नाईक यांनी केला आहे.

मला इथून उमेदवारी देण्याचे आश्वासन मिळाले होते

यतीश नाईक पत्रात लिहितात, गेल्या 15 वर्षांपासून मी साळगाव मतदार संघातील लोकांची सेवा करत आहे. मला इथून उमेदवारी देण्याचे आश्वासन मिळाले होते. साळगाव मतदारसंघातून (Constituency) निवडणूक (Election) लढवण्याची माझी इच्छा होती.

घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात देखील केली

त्यानुसार मी घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात देखील केली होती. मतदारांनी माझ्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र पक्षाने जाहीर केलेल्या दोन उमेदवारी यादीत माझे नाव नाही. यामुळे मला पूर्णपणे अपमानित आणि निराश वाटत आहे.

यतीश नाईक पुढे लिहितात, मला याची खंत वाटते की शेवटच्या क्षणाला पक्षात प्रवेश केलेल्या लोकाना उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र मला बाजूला करण्यात आले. यतीश नाईक यांनी
निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavisha 06 November 2024: शेअर बाजारात गुंतवणूकीचा विचार करताय सावधान... जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Pramod Sawant: कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्यावरुन संतापले गोव्याचे मुख्यमंत्री; शांतता आणि एकतेवर हल्ला असल्याची टीका

Panaji: अजगराला फरफटत नेणे, ओढून त्रास देणे भोवले; वन विभागाने घेतली दखल, गुन्हा नोंद

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT