Shanaya and Evarist Dainik Gomantak
गोवा

Tiatr Academy Of Goa: तियात्र अकादमीचे पुरस्कार जाहिर; शनाया आणि एव्‍हारिस्‍ट 'यंग ॲचिवर्स'

Tiatr Academy Of Goa तियात्र रंगमंचावरील पहिली स्‍त्री कलाकार स्‍व. रेजिना फर्नांडिस यांच्‍या जयंतीदिनी हे पुरस्‍कार दिले जाणार

गोमन्तक डिजिटल टीम

Tiatr Academy Of Goa गोवा तियात्र अकादमीतर्फे उभरत्‍या तियात्र कलाकारांना देण्‍यात येणारे यंग ॲचिवर्स हे पुरस्‍कार यावेळी शनाया परेरा आणि एव्‍हारिस्‍ट रॉड्रीगीस यांना जाहीर करण्‍यात आले आहे.

तियात्र रंगमंचावरील पहिली स्‍त्री कलाकार असलेल्‍या स्‍व. रेजिना फर्नांडिस यांच्‍या जयंतीदिनी 16 नोव्‍हेंबर रोजी होणार्‍या कार्यक्रमात हे पुरस्‍कार दिले जाणार आहेत.

तियात्र रंगमंचावर नेत्रदीपक काम करणार्‍या युवा तियात्र कलाकारांना हा पुरस्‍कार दिला जातो.

16 नोव्‍हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता पणजीच्‍या मिनेझिस ब्रागांझा सभागृहात माजी सभापती आणि तियात्रिस्‍त तोमाझिन कार्दोज यांच्‍या हस्‍ते ह्या पुरस्‍कारांचे वितरण केले जाणार आहे. यावेळी तियात्र अकादमीचे अध्‍यक्ष मिनीन फर्नांडिस आणि उपाध्‍यक्ष सुकूर फर्नांडिस हे उपस्‍थित रहाणार आहेत. त्‍यानंतर कोंकणी म्‍युझिकल शो होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT