Goa MLA Carlos Ferreira Supports Protest Dainik Gomantak
गोवा

World Peace University Thivim: थिवी आणि कोमुनिदाद गावकरी एकवटले; प्रस्तावित विद्यापीठाविरोधात छेडणार आंदोलन

Goa MLA Carlos Ferreira Supports Protest: थिवी येथील प्रस्तावित खासगी विद्यापीठाविरोधात ग्रामस्थ आणि कोमुनिदाद गावकारांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: थिवी येथील प्रस्तावित खासगी विद्यापीठाविरोधात ग्रामस्थ आणि कोमुनिदाद गावकारांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला आहे. या विद्यापीठासाठी पुणेस्थित ‘एमआयटी’ संस्थेला लिलावाविना २ लाख चौरस मीटर जमीन देऊन बनावटगिरी आणि फसवणूक केल्याचा दावा करत बुधवारी (4 डिसेंबर) हळदोण्‍याचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांच्या उपस्थितीत थिवी कोमुनिदाद गावकार आणि ग्रामस्थांनी संयुक्तरीत्या कोमुनिदाद व्यवस्थापकीय समितीविरोधात निरीक्षक विजय राणे यांच्याकडे लिखित तक्रार दिली.

कोमुनिदाद अध्यक्ष मिंगेल सिक्वेरा, अॅटर्नी जेम्स डिसोझा, खजिनदार जेसलन परेरा, इस्क्रिवाव, प्रणव पार्सेकर या कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांविरोधात कोलवाळ पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. फिर्यादी डग्लस सिक्वेरा, गॉडफ्रे डिलिमा, जोस डिमेलो, लॉरेन्स फेर्राव, आंतोनिओ फोन्सेका, अँड्रियन डिसोझा, बेस्तियन डिसोझा व इतरांनी तक्रार दाखल केली आहे.

बनावट दस्तावेज बनवून दिशाभूल

पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमताने कोमुनिदाद जमिनीचे खोटे दस्तावेज तयार केले आणि सादर करत विनालिलाव जमीन मंजूर करण्यासाठी सरकारची दिशाभूल केली. तसेच पुणेस्थित एमआयटी ग्रुप इन्‍स्‍टिट्यूटच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी आणि शैक्षणिक संशोधन अकादमी या संस्थेला कोमुनिदादची २ लाख चौ. मी. जमीन खासगी विद्यापीठ उभारणीसाठी दिली. हा फसवणुकीचा (Fraud) प्रकार निदर्शनास आल्यानंतर संशयितांविरोधात चौकशी करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT