इफ्फी यंदा गोव्याच्या चित्रपटांना मुकणार आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa: अर्थसाहाय्याच्या अभावामुळे इफ्फीमध्ये यंदा गोव्याचा एकही चित्रपट नाही!

इफ्फी (Iffi) यंदा गोव्याच्या चित्रपटांना मुकणार आहे. मनोरंजन सोसायटीच्या अर्थसाहाय्याच्या अभावामुळे अनेक निर्माते अडचणीत आहेत. केंद्रीय चित्रपट संचालनालयाकडून इफ्फीतील ‘इंडियन पॅनोरामा’ या विभागासाठी अर्ज मागवण्यात आले असून २० ते २८ नोव्हेंबर या काळात हा महोत्सव होणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: यंदा होणाऱ्या ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे (52nd International Film) (इफ्फी) (Iffi) बिगूल वाजण्यास सुरुवात झालेली असताना गोव्यातून यंदाच्या इंडियन पॅनोरामात (Indian Panorama from Goa) आपली प्रवेशिका सादर होईल, अशा तयारीचा एकही प्रादेशिक सिनेमा तयार नसावा (No regional cinema should be created) ही राज्यातील चित्रपट निर्मात्यांची (filmmakers) खंत आहे. इफ्फी यंदा गोव्याच्या चित्रपटांना मुकणार आहे. मनोरंजन सोसायटीच्या अर्थसाहाय्याच्या अभावामुळे (Due to lack of funding) अनेक निर्माते अडचणीत आहेत. चित्रपट निर्मितीला सरकारकडून मिळणारे आर्थिक अनुदान रोखले गेले तेव्हापासून गोव्यात तयार होणाऱ्या प्रादेशिक चित्रपटांची संख्या रोडावत गेली आणि दर्जावरही परिणाम झाला,’’ असे मत ‘पलतडचो मनीस’, ‘बागा बीच’ यासारखे दर्जेदार व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता लाभलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक लक्ष्मीकांत शेटगावकर यांनी व्यक्त केले.

केंद्रीय चित्रपट संचालनालयाकडून इफ्फीतील ‘इंडियन पॅनोरामा’ या विभागासाठी अर्ज मागवण्यात आले असून २० ते २८ नोव्हेंबर या काळात हा महोत्सव होणार आहे. प्रवेशिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांत नमूद केल्याप्रमाणे, चित्रपट १ ऑगस्ट २०२० ते ३१ जुलै २०२१ पर्यंत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) साठी सादर झालेला असला पाहिजे. बोर्डाचे प्रमाणपत्र मिळाले नसले तरी या काळात तयार झालेल्या चित्रपटांसाठी प्रवेशिका पाठवण्यास हरकत नाही. चित्रपट इंग्रजी सबटायटल्ससह असणे आवश्यक आहे.

प्रादेशिक सिनेमा कसा करावा?

२००४ ते २०१४ पर्यंत गोमंतकीय चित्रपट क्षेत्रात जे उत्साहाचे वातावरण होते ते आता नाहीसे झाले आहे. याचे कारण चित्रपट अनुदान योजना राबवण्यात सरकारला आलेले अपयश. लक्ष्मीकांत शेटगावकर यांनी या संबंधात प्रश्न उपस्थित केला की सरकारनेच जर पाठबळ दिले नाही तर गोव्यात प्रादेशिक सिनेमा करावा कोणी?

डॉ. प्रमोद साळगावकर यांच्या ‘शर्वणी प्रॉडक्शनतर्फे’ तयार होणाऱ्या या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम चालू असून ते लवकरात लवकर संपवून एक ऑगस्टची मुदत पूर्ण करून पॅनोरमात प्रवेश घेण्यासाठी आमची धडपड चालू आहे, अशी माहिती शिकेरकर यांनी दिली.

युवकांना चित्रपट बनवण्यासाठी इफ्फीने प्रेरणा द्यावी

इफ्फी गोव्यात आल्यापासून गोमंतकीय दिग्दर्शकाने तयार केलेला एकतरी सिनेमा या महोत्सवाच्या प्रतिष्ठेच्या ‘इंडियन पॅनोरामा’ किंवा महोत्सवाच्या ‘गोवा’ विभागात सातत्याने प्रदर्शित झालेला आहे. चित्रपट निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या गोमंतकीय युवकांना चित्रपट बनवण्यासाठी प्रेरणा देण्याचे श्रेय निश्चितच इफ्फीला द्यायला हरकत नाही, परंतु अलीकडच्या वर्षात मात्र राज्यातील चित्रपटांची संख्या इफ्फीत रोडावत गेली आहे.

२०१५ साली इफ्फीच्या गोवा विभागात असलेल्या ‘तू हांव, हांव तू’ या सिनेमाने रसिकांचे लक्ष वेधून घेणारे रामप्रसाद आडपैकर म्हणाले, की त्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सरकारकडून येणे असणारे अर्थसाहाय्य अजून बाकी आहे. आर्थिक बोज्यातून सुटका करून घेण्यासाठी आपण नंतर मुंबईला जाऊन साहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामाला सुरुवात केली. लक्ष्मीकांत शेटगावकर किंवा रामप्रसाद आडपैकर यांच्या मते सरकारचे या संबंधात निश्चित धोरण असते तर कोरोनाचा बाऊ न होता अलीकडच्या काळातही गोव्यात अनेक दर्जेदार चित्रपट नक्कीच बनले असते.

इफ्फी गोव्यात आल्यापासून सातत्याने चित्रपट निर्मिती करून महोत्सवात स्थान प्राप्त करणारे दिग्दर्शक-निर्माते राजेंद्र तालक यांच्या म्हणण्यानुसार, कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गोव्यात चित्रपट निर्माण होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. अर्थात, सरकारची चित्रपट अनुदान योजना अलीकडच्या काळात बंद आहे हेदेखील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दुसरे कारण होऊ शकते. आरोग्यविषयक धोरणांना सरकारचे प्राधान्य देणे साहजिक असून परिस्थिती निवळल्यानंतर ही योजना पुन्हा कार्यान्वित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, त्यातल्या त्यात आशेचा किरण म्हणजे, दिग्दर्शक जितेंद्र शिकेरकर यांचा ‘डिकॉस्ता हाऊस’ हा कोकणी चित्रपट पूर्ण होण्याच्या मार्गावर असून त्याचे साऊंडचे काम अजून बाकी आहे. पुढील काही दिवसांत ते पूर्ण झाले तर सुदैवाने एक गोमंतकीय सिनेमा इंडियन पॅनोरामासाठी आपली प्रवेशिका पाठवू शकेल.

मागची कित्येक वर्षे गोमंतकातील चित्रपट दिग्दर्शकांनी इफ्फीतच नव्हे तर जगभरच्या अनेक महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवातून स्थान मिळवले आहे. अशा गोमंतकीय चित्रपट क्षेत्रातून इफ्फीच्या इंडियन पॅनोरामासाठी प्रवेशिका पाठवण्याबद्दल असलेली साशंकता नेमके काय दर्शवते?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT