Goa Forward Party Dainik Gomantak
गोवा

Goa Forward Party: राज्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ; गोवा फॉरवर्ड म्हणतेय CCTV बसवा, सुरक्षा आणि पर्यटन...

Goa Forward Party: गोवेकरांनो सतर्क रहा! शाळा-कॉलेजेस् देखील चोरट्यांच्या निशाण्यावर

Ganeshprasad Gogate

Goa Forward Party: गोव्यात सध्या अपघातांपेक्षाही जर कुठल्या घटनांचे पोलीस प्रशासनासमोर आव्हान तयार झाले असेल तर ते चोऱ्या आणि दरोड्यांचे.

राज्यात अपघातांच्या बरोबरीने चोऱ्यांचे प्रमाणही वाढत असून चोरट्यांनी शहरीभागासहित ग्रामीण भागातील आस्थापनांना लक्ष केल्याचे सध्या दिसून येतंय. मागील चार महिन्यातील चोरी प्रकरणांची आकडेवारी काढली तर ती किमान 30-35 च्या घरात जाईल.

एवढे दिवस चोरटे शहरी भागातील दुकाने, हॉटेल्स, बँकांची ATM, मंदिरे यांना लक्ष करीत होते, मात्र या महिनाभरात चोरट्यांनी चक्क शाळा-कॉलेजवर डल्ला मारायला सुरुवात केलीय.

महिनाभरात ३ शाळांवर चोरांनी डल्ला मारला असून त्यांनी शाळेतील पैसे आणि डीव्हीर चोरल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

सोमवारी मुरगाव येथील केशवस्मृती शाळेतील तब्बल 4 ऑफिस फोडून चोरट्यांनी तब्बल 50 हजारांचा ऐवज पळवल्याची घटना घडल्यावर राज्यात कायदा-सुव्यवस्था आणि एकूणच चोरी प्रकरणांची साखळी याबाबत चर्चां सुरु झाली.

स्थानिकांसहित पोलीस प्रशासनासमोर देखील या वाढत्या चोऱ्यांमुळे आव्हान तयार आले असून दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

गोव्‍यातील वाढत्‍या चोर्‍या आणि वाढत्या गुन्‍हेगारीची पार्श्वभूमी लक्षात घेतल्‍यास गोव्‍यातील सर्व पंचायती आणि नगरपालिका क्षेत्रात सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यांच्‍या निगराणीखाली आणण्‍याची गरज गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी व्‍यक्‍त केली आहे.

तसे केल्‍यास राज्‍यातील नागरिकांना सुरक्षा मिळण्‍याबरोबरच पर्यटनाच्‍या दृष्‍टीनेही तो एक चांगला उपाय ठरेल असे मत राज्‍याच्‍या मुख्‍य सचिवांना लिहिलेल्‍या पत्रात व्‍यक्‍त केले आहे.

राज्‍यात वाढलेली गुंडगिरी आणि चोर्‍या नियंत्रणात आणण्‍यासाठी अशा व्‍यवस्‍थेची नितांत गरज असल्‍याचे नमूद करुन हे कॅमेरे चालू रहातील याचीही दक्षता घेण्‍याची गरज व्‍यक्‍त केली आहे.

त्‍यासाठी या कॅमेर्‍यांची वेळोवेळी दुरुस्‍ती करण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्त केली आहे. गोव्‍याची सुरक्षितता अबाधीत रहावी यासाठी गोवा फॉरवर्ड पक्ष सदोदित सहकार्य करेल. या मागणीची गरज लक्षात घेऊन ही उपाययोजना तातडीने अंमलात आणली जाईल अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली अाहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punav Utsav: देव भगवतीच्या चव्हाट्यावर येतात, मंगलाष्टके म्हणून ‘शिवलग्न’ लावले जाते; पेडणेची प्रसिद्ध 'पुनाव'

Goa Agriculture: 'थोडा अभ्यास वाढवला, सरकारने सहकार्य केले तर गोव्यात मुबलक भाजीपाला पिकेल'; कृषी राजदूत 'वरद'चे प्रतिपादन

Punav Utsav: ‘एका रातीन आनी एका वातीन, माका देऊळ बांधून जाय’! शेकडो वर्षांची परंपरा असलेली पेडण्याची 'पुनाव'

Supreme Court On Cricket: 'क्रिकेट' आता खेळ नाही, केवळ व्यवसाय! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

Mumbai Goa Highway: वडखळ नाक्याच्या दुरावस्थेविरोधात शेकापचं आंदोलन, मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT