Goa Election 2024: दक्षिणेत भाजपचा उमेदवार कोण? अन्य पक्षांचेही उमेदवार निवडीकडे लक्ष

South Goa Lok Sabha Election 2024 BJP Candidate News: आज दुसरी यादी जाहीर होणार
Goa Lok Sabha Election 2024
Goa Lok Sabha Election 2024Dainik Gomantak

South Goa Election 2024 Candidate News:

भाजप दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार आहे, याकडे भाजपवासी यांचेच नव्हे, तर अन्य पक्षांचेही लक्ष लागून राहिले आहे. भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाची बैठक आज सायंकाळी सात वाजता दिल्लीतील भाजप मुख्यालयात होणार आहे.

त्यानंतर भाजपकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे.
या यादीत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा समावेश आहे किंवा नाही याविषयी सध्या चर्चा सुरू आहे.

भाजपने स्थानिक पातळीवरून पाच नावाची शिफारस दिल्लीला केली होती. त्यांपैकी सभापती रमेश तवडकर आणि आमदार दिगंबर कामत यांनी निवडणूक लढवण्यात रस नसल्याचे सांगितल्याने त्यांच्या नावाचा विचार नंतर केंद्रीय निवडणूक समिती समोर झाला नाही.

भाजपने राज्यातून दिल्लीला पाठवलेली नावे आणि भाजपने स्वतंत्रपणे केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलेली नावे जुळत नसल्यामुळे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून एखाद्या महिलेच्या नावाचा विचार करावा, अशी सूचना पक्षश्रेष्ठीकडून करण्यात आली होती. त्या दृष्टीने प्राथमिक चाचपणी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून करण्यात आली आहे.

Goa Lok Sabha Election 2024
Goa Theft Case: मुरगावात चोरट्यांचा हैदोस; मंदिरांनंतर आता शाळांवर लक्ष; केशवस्मृती शाळेत नासधूस करत 50 हजारांची रोकड लंपास

जिंकून येण्याची क्षमता हा निकष उमेदवारीसाठी लावला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.

यामुळे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजप यापूर्वी सुचवलेल्या नावांचा विचार करणार की एक एखाद्या महिलेच्या नावाचा विचार करणार याविषयी सध्या गुढ निर्माण झालेले आहे.

भाजपच्या आज होणाऱ्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ठरणाऱ्या दुसऱ्या यादीत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार त्यामुळे ठरणार की नाही याविषयी सध्या चर्चेला ऊत आलेला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार उमेदवारी जाहीर करण्यासाठी तिसऱ्या यादीची ही कदाचित प्रतीक्षा करावी लागू शकते.

...सोबत घेण्याचे शहाणपण!

भाजप कोणाला उमेदवारी देणार, याकडे प्रामुख्याने काँग्रेसचे लक्ष लागून राहिलेले आहे. मत विभागणी टाळण्यासाठी अन्य राजकीय पक्षांना सोबत घेण्याचे शहाणपण या खेपेला काँग्रेसने दाखवलेले आहे.

तरीही दक्षिण गोव्यातील चार लाख हिंदू मते आपल्याकडे वळवण्यासाठी सत्ताधारी भाजप कोणती खेळी खेळतो, याकडे काँग्रेसचे लक्ष आहे.

यामुळेच काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा पुढे ढकलली आहे. काँग्रेसने लोकसभेसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी यापूर्वी जाहीर केली आहे. त्यामध्ये गोव्यातील दोन्ही जागांचा समावेश करण्यात आलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com