Goa Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case: अजब चोरीची गजब कहाणी! अपघातग्रस्त ट्रक, पोलिसांचा पंचनामा आणि पट्ठ्याचा प्रयत्न...

राज्यात दररोज अपघात, गुन्हेगारीच्या घटना वाढत असून यात कधी परप्रांतीयांचा तर कधी राज्यातील व्यक्तींचा हात असल्याचं निदर्शनाला येतंय.

Ganeshprasad Gogate

Goa Theft Case एका अपघातग्रस्त ट्रेलर ट्रकची चोरी केल्याची अजब घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या संबंधित मिळालेली माहिती पुढील प्रमाणे, जुने गोवा पोलिसांनी अपघातात सहभागी असलेल्या एका ट्रेलर ट्रकचा पंचनामा करून तो ट्रक खोर्लीजवळच्या आयटीआय नजीक पार्क करून ठेवला होता.

या राजस्थान स्टेट पासिंगच्या ट्रेलर ट्रकची चिंबेल येथील रहिवासी शिवराम रमाकांत कदम चोरी करण्याचा प्रयन्त केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालीय. मात्र पोलिसांच्या सतर्कपणामुळे संशयित कदम याला पकडण्यात ओल्ड गोवा पोलिसांना यश आलंय.

राज्यात दररोज अपघात, गुन्हेगारीच्या घटना वाढत असून यात कधी परप्रांतीयांचा तर कधी राज्यातील व्यक्तींचा हात असल्याचं निदर्शनाला येतंय.

शनिवारी ओल्ड गोवा पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रक्ररणी कर्नाटकच्या युवकाला ताब्यात घेतल्याचे समोर आले होते.

तसेच शुक्रवारी पर्वरी येथील राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस व इनोव्हा या टुरिस्ट टॅक्सीमध्ये समोरासमोर टक्कर झाल्याची घटना घडली होती.

परिणामी, या अपघातामुळे म्हापसा व पणजी या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त वाहने बाजूला करेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

पोलीस प्रशासनाला दैनंदिन घडणाऱ्या अशा घटनांमुळे अधिक सतर्क राहणे गरजेचे बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT