Logistics Trade: मोपा विमानतळामुळे हवाई कार्गोचा मार्ग मोकळा झाला असून मुरगाव पोर्टने आपली लॉजिस्टिक यंत्रणा सुरळीत केल्यास गोव्यात लॉजिस्टिक व्यापाराची मोठी संधी असल्याची माहिती सीआयआय पॅनेलचे समन्वयक अँथनी गॅस्केल यांनी दिली आहे.
पणजीत २९ सप्टेंबर रोजी नियोजित सीआयआय लॉजिस्टिक परिषद होत असून त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी राज आमोणकर, अंकुर परमल, अनिरुद्ध अग्रवाल उपस्थित होते. गॅस्केल म्हणाले, लॉजिस्टिक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी परिषदेची मदत होईल.
ही परिषद उद्योग क्षेत्रातील उधोजक, धोरणकर्ते आणि भागधारकांना एकत्र येण्यासाठी आणि गोव्यातील लॉजिस्टिकचे भविष्य घडविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. लॉजिस्टिक खर्च जीडीपीच्या ९ टक्के पर्यंत खाली आणणे आहे जो सध्या १३ ते १४ टक्के आहे.
- अनिरुद्ध अग्रवाल, अध्यक्ष, सीआयआय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.