डिचोली-साखळी रस्त्याची डागडुजी सुरु Dainik Gomantak
गोवा

Goa: दै 'गोमन्तक' बातमी इफेक्ट

पावसाळ्यात खड्डयां मध्ये पाणी साचले, की वाहन चालकांना (driving)खड्डयांचा अंदाज येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा तोल जावून दुचाकी पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोली-साखळी (bicholim)रस्त्याच्या दूरवस्थे बाबत दै गोमन्तक (Dainik Gomantak)मध्ये प्रसिद्ध झालेनंतर बातमीची दखल अखेर प्रशासनाकडून घेण्यात आली. या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरु करण्यात आले आहे. कुळण येथे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामही सुरु झाले आहे. डिचोली-साखळी हा मुख्य रस्ता आहे. हा रस्त्या ठिकठिकाणी उखडला असून, लहानमोठे खड्डे पडले आहेत. कुळण-सर्वण ते साखळी पुलाला जोडलेला विठ्ठलापूरपर्यंतचा रस्त्यावरही मोठं मोठाले खड्डे पडले आहेत.

कुळण येथील आधार हॉस्पिटल,(Aadhar Hospital) विजयनगर-कारापूर आणि साखळी पुलाजवळ विठ्ठलापूर (vithalapur)येथे तर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

पावसापावसाळ्यात खड्डयां मध्ये पाणी साचले, की वाहनचालकांना खड्डयांचा अंदाज येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा तोल जावून दुचाकी पडण्याच्या घटना घडल्या आहेत. खड्डयांमुळे वाहनांची मोठे नुकसान होत असते. त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे.

"डिचोली-साखळी रस्त्याला खड्डयांचे ग्रहण" (Assumption)या मथळ्याखाली दै. "गोमन्तक" मधून बातमी प्रसिद्ध झाली. यानंतर तातडीने या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरु झाले आहे. यामुळे वाहनचालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT