गोव्यात काळ्या भात शेतीचा पहिलाच प्रयोग  Dainik Gomantak
गोवा

Goa: काळ्या भात शेतीचा पहिलाच प्रयोग

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : पर्ये मतदारसंघातील भिरोंडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या अडवई येथील उदयसिंह राणे यांनी सरकारने (Government) सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेमुळे (Self-reliant India and self-sufficient Goa) प्रभावित होऊन वाळपई कृषी खात्याच्या (Department of Agriculture) सहकार्याने बऱ्याच वर्षांनी सुमारे दीड हजार चौरस मीटर जमिनीत काळ्या जातीच्या भाताची (Rice) लागवड करून या भागात अशाप्रकारच्या भाताच्या लागवडीचा पहिला प्रयोग सुरू (The first experiment) केला आहे. या भाताच्या उत्पादनातून (Production of Paddy)चांगला मोबदला मिळणार असल्याचे उदयसिंह राणे यांनी सांगितले.

राज्याची जीवनदायीनी म्हणून गणल्या जाणाऱ्या म्हादई नदीच्या काठावर वसलेले भिरोंडा पंचायत क्षेत्र हे कृषीसंपन्न असून ऊस, काजू, नारळ, सुपारी, केळी लागवडीसह फळभाज्यांचे, भात, नाचणी पिकाचे उत्पादन घेण्यास या भागातील नागरिक अग्रेसर आहेत. त्यामुळे बदलत्या काळातसुद्धा येथील युवा पिढीकडून शेती व्यवसायाची परंपरा कायम राखलेली दिसत आहे, परंतु वाढत्या रानटी जनावरांच्या दहशतीमुळे होणारे नुकसान, वाढती मजुरी आणि महत्त्वाचे म्हणजे शेती उत्पादनाला बाजारपेठेत मिळणारा कमी भाव, यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. त्यासाठी सरकारने योग्य नियोजन करून रानटी जनावरांपासून संरक्षण, मजुरीसाठी अनुदान व शेती उत्पादनाला योग्य मोबदला मिळवून दिल्यास खऱ्या अर्थाने सरकारच्या धोरणानुसार शेतकरी आत्मनिर्भर भारतातील स्वयंपूर्ण शेतकरी होण्यास वेळ लागणार नाही, असे मत उदयसिंह राणे यांनी व्यक्त

केले.

"गेल्या वर्षी काही जमिनीत हळसांदा पिकाची लागवड केली होती. त्यासाठी बियाणे विकत आणून मशागतीवर हजारो रुपये खर्च केले होते. त्यातून उत्पादनही चांगले मिळाले होते, परंतु बाजारात योग्य भाव मिळाला नाही. एरवी गावठी हळसांद्याला चांगली मागणी आहे व दुकानातून विकत घेताना बराच भाव आहे, पण शेतकरी ज्यावेळी माल विकायला बाजारात जातो, त्यावेळी त्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही."

- उदयसिंह राणे, शेतकरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT