Goa Shiv Sena chief Jitesh Kamat speaking at Pedne Sabha. Along with other Shiv Sena office bearers and Shiv Sainiks, Goa.  Prakash Talavnekar / Dainik Gomantak
गोवा

Goa: मुख्यमंत्र्यानी माफी मागावी, अन्यथा गावागावांत विषय नेऊ; शिवसेनेचा इशारा

भाजपला (Goa BJP) पाठिंबा म्हणजे पापाला प्रोत्साहन देणे (Goa)

Prakash Talvanekar

Pernem: राज्यात (Goa) कायदा आणि सुव्यवसंस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असुन सरकारच स्वतःची जबाबदारी झटकत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांनी अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी (Benaulim Rape Case) पालकांना जवाबदार धरुन पालकांवर आरोप केल्या संबंधी मुख्यमंत्र्यानी माफी मागावी अन्यथा शिवसेना (Goa Shivsena) हे प्रकरण प्रत्येक तालुक्यात लोकांसमोर नेऊन निषेध नोंदवेल, असा सज्जड इशारा पेडणे येथे जुन्या बस स्थानकावर (Old bus stand Pernem) घेतलेल्या जाहीर सभेत देवून मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यचा शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला.

गोवा राज्य शिवसेना प्रमुख जीतेश कामत बोलताना म्हणाले कि, बाणावली येथे झालेल्या दोन अल्पवयीन मुली बरोबर एका मुलीचा भाऊ व भावाचा मित्र होता. त्याना मारझोड करुन त्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. राज्यात कायदा व सुव्यवस्था कोसळलेली आहे त्यासाठी सरकार जवाबदार असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे त्याकडे दुर्लक्ष करून ज्यांच्या पाल्यावर अत्याच्यार झाला आहे, त्याच पालकांनाच दोषी ठरवतात. देशात सर्वत्र टीका होऊ लागल्यानंतर प्रकरण अंगलट येत आहे ते पाहुन परत विधानसभेत पालकांनी विद्यार्थ्यावर चांगले संस्कार घडवावेत म्हणून सांगतात. अत्याच्यार झालेल्यांनाच मुख्यमंत्री जे काही सांगतात त्यावरुन भाजपची कसली संस्कृती हे स्पष्ट होते. बेजवाबदार वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यानी पालकांची माफी मागावी अन्यथा आगामी विधानसभा निवडणूकी पर्यंत आम्ही हे प्रकरण राज्यभर नेऊन त्यांना उघड्यावर पाडणार आहोत.

गोवा राज्य शिवसेना उपप्रमुख सुभाष केरकर म्हणाले कि, भाजप राजवटीत तीन वर्षापुर्वी एका शाळेच्या परिसरात दिवसाढवळ्या बलात्कार झाला. त्या आरोपीना पकडता आले नाही. दिल्लीत  निर्भया प्रकरण झाले. तोर्से येथील चंद्रकांत बांदेकर खून प्रकरणातील खुनी अद्याप सापडत नाहीत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोसळलेली आहे. अल्पवयीन मुली सोबत त्यांचा भाऊ व मित्र असताना त्याना माराहण करुन दोन्ही  मुलीवर अत्याच्यार झाले असे असताना  मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पालकांनाच दोष देतात.त्यांनी  याप्रकरणी गोमंतकीय पालकांची माफी मागावी अन्यथा हे प्रकरण आम्ही लोकांपुढे नेऊ. 

गोवा राज्य शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद गावस म्हणाले की,ज्या मुलीवर त्यांच्या भावा समक्ष बलात्कार झाला त्यानाचा मुख्यमंत्री सल्ले देतात म्हणजे बलात्कार करणाऱ्यानाच प्रोत्साहन देतात. तर महिला असलेल्या मुख्यमंत्र्याच्या पत्नी ही त्यांचे समर्थन करतात हे सगळे निंदनीयच आहे. मुख्यमंत्र्यांचे मुलीवरील वक्तव्य हे गुन्हेगारांना पाठिंबा देणारे आहे. ह्या प्रकरणी भाजपला तुम्ही पाठिंबा देऊ नका. भाजपला पाठिंबा म्हणजे पापाला प्रोत्साहन देणे, पाप तुमच्या माथ्यावर घेऊ नका. यावेळी शिवसेना सचीव मेहबूब नर्बान , पेडणे तालुका प्रमुख बाबली नाईक,परशुराम पाटील,राजाराम पार्सेकर, मंदार सुधाकर माने,प्रतिक शिरोडकर, विलास नाईक, व्हिल्सन परेरा, मनोज सावंत, कृष्णा गावकर, समीत परवार,उत्तर गोवा प्रमुख सुशांत पाउसकर, दीवाकर जाधव,प्रभाकर राव आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT