Goa: धोका ओळखण्यासाठी ठेवण्यात आलेल्या बेरीकेड
Goa: धोका ओळखण्यासाठी ठेवण्यात आलेल्या बेरीकेड दैनिक गोमन्तक
गोवा

गवाणे येथील एका मिनी पुलाचा कठडा कोसळल्यामुळे वाहतुकीस व्यत्यय

Dainik Gomantak

Guleli: वाळपई मतदार संघातील (Valpoi constituency) खोतोडा पंचायत क्षेत्रातील गवाणे येथील मिनी पुलाचा (mini bridge) एका बाजूचा मातीचा भाग कोसळला असून या रस्त्यावरून वाहतूक करणे आता धोकादायक (Dangerous Bridge) बनले आहे.

वाळपई खोतोडा मोले दरम्यानच्या या रस्त्यावर असलेल्या गवाणे येथील एका मिनी पुलाचा कठडा कोसळल्यामुळे वाहतुकीला व्यत्यय निर्माण झालेले आहे . या मिनी पुलाच्या बाजूचा मातीचा भराव गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याबरोबर कोसळला असून सध्या या ठिकाणी बेरीकेड व धोका दर्शवीणारे अन्य साधने लावून वाहनचालकांना या संदर्भात माहिती व्हावी अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

गवाणे खोतोडा येथे असलेल्या मिनी पुलाच्या बाजूची माती कोसळल्याने धोका निर्माण झाला आहे

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री सदर घटना घडली एका बाजूची माती पूर्णपणे कोसळली असून या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. या रस्त्यावरून मोले,साकोर्डा,तांबडीसुर्ल आदी भागात मोठ्या प्रमाणात लोक तसेच पर्यटक जात असल्याने सदर पुलाच्या एका बाजूला असलेल्या भागाची माती कोसळल्याने धोका निर्माण झाला आहे.

अवजड वाहनांचीसुध्दा या भागातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अधिक धोका निर्माण झाला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाने लवकरात लवकर या ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे असे जाणकार नागरिकांचे मत आहै.

सत्तरीतील सर्व साकव धोकादायक

मागील जुलै महिन्यात पडलेल्या पावसात पैकुळ येथील पूल वाहून गेला तशाच प्रकारे अशे छोटे छोटे साकव मिनी पुल धोकादायक बनले आहेत . अनेक वर्षांपूर्वी उभारलेला या पुलांची डागडूजी होणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करु लागले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT