Workers constructing 'Artificial Lake' in Bicholin (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: डिचोलीतील 'कृत्रिम तळे' वादाच्या भोवऱ्यात

बांधकाम बेकायदा असल्याची माजी उपनगराध्यक्षांची पालिकेत तक्रार (Goa)

तुकाराम सावंत

डिचोली शहरातील (Bicholim city) गृहनिर्माण वसाहतीत (Housing Colony) गणेश विसर्जनासाठी बांधण्यात येणारे 'कृत्रिम तळे' (Artificial Lake for immersion of Ganesha) आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. गृहनिर्माण मंडळाने आरक्षित करून ठेवलेल्या जागेत बेकायदेशीररित्या हे तळे बांधण्यात येत असल्याचा दावा डिचोलीचे माजी उपनगराध्यक्ष (Former Deputy Mayor) भगवान हरमलकर यांनी करून, तशी लेखी तक्रार बुधवारी (ता.18) डिचोली पालिकेत केली आहे. या बेकायदा बांधकामा विरोधात कारवाई करावी. अशी मागणीही त्यांनी केली आहे. गेल्या महिन्यात गृहनिर्माण मंडळ सोसायटीतर्फे या बांधकामा संदर्भात पालिकेत निवेदन देण्यात आले आहे. पालिका मंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झालेली आहे. आता माजी उपनगराध्यक्षाने तक्रार केल्याने या बांधकामा संदर्भात पालिका आता कोणता निर्णय घेते, ते पहावे लागेल. दरम्यान, कृत्रिम तळे ही तात्पुरती व्यवस्था असून, या प्रकल्पाला गृहनिर्माण वसाहतीतील गणेशभक्तांचा पाठींबा आहे. असे या भागाचे नगरसेवक (Corporator) विजयकुमार नाटेकर यांनी स्पष्ट केले आहे.

गृहनिर्माण वसाहतीतील काही गणेशभक्त आतापर्यंत तेथीलच एका विहिरीत गणपती विसर्जन करीत आले आहेत. मात्र विहिरीत गणपती विसर्जन करताना येणारी अडचण लक्षात घेवून 'कृत्रिम तळे' उभारण्याची संकल्पना पुढे आली आहे. एकाचवेळी जवळपास 30 गणपतींच्या मूर्ती विसर्जित करणे शक्य व्हावे. असे नियोजन करून हे तळे उभारण्याचा प्रस्ताव आहे. गृहनिर्माण वसाहतीतील मोकळ्या जागेत या तळ्याच्या बांधकामास सुरवातही झाली आहे.

बांधकाम बेकायदा

गृहनिर्माण मंडळाने भूखंड देताना नगरनियोजन खात्याच्या नियमानुसार वसाहतीत 33 टक्के जागा खुली ठेवलेली आहे. मात्र या जागेत बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात येत आहे. गृहनिर्माण वसाहत संघटनेने वीस दिवसांपूर्वी पालिकेत निवेदन दिलेले आहे. मात्र अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. आतापर्यंत ज्या विहिरीत गणपती विसर्जन करण्यात येत आहे, त्या वसाहतीतील विहिरीच्या दुरुस्तीपोटी लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. सध्या विहिरीची वाताहात झालेली आहे.

- भगवान हरमलकर, माजी उपनगराध्यक्ष.

गणेशभक्तांचा पाठींबा

गृहनिर्माण वसाहतीतील गणेशभक्तांची गणपती विसर्जनावेळी होणारी अडचण लक्षात घेवून ही तात्पुरती व्यवस्था करण्यात येत आहे. मागील महिन्यात झालेल्या गृहनिर्माण वसाहतीतील गणेशभक्त नागरिकांच्या बैठकीत गणेशभक्तांनी या संकल्पनेला पाठींबा दिला आहे. या प्रकल्पासाठी गणेशभक्तांकडूनच निधी उभारण्यात येत आहे.

-विजयकुमार नाटेकर, नगरसेवक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बंगाल हादरले! झोपेत असताना 'मच्छरदाणी फाडून'अपहरण, लैंगिक अत्याचारानंतर 4 वर्षांची चिमुकली आढळली गटाराजवळ

Konkani Drama: सर्जनशीलतेचा प्रत्यय देणारी व्हिजुअल ट्रिट - ‘इन सर्च ऑफ सर्वायव्हल’

Goa Chess World Cup: जगज्जेत्या गुकेशचे आव्हान संपुष्टात! स्वेनने केले पराभूत; अर्जुन, प्रज्ञानंद, हरिकृष्ण, प्रणव चौथ्या फेरीत दाखल

Goa: "किती पैसे घेतेस?", गोव्यात 19 वर्षांच्या मुलीसोबत गैरव्यवहार! 'विदेशी पर्यटक' समजून अश्लील कमेंट्स; Video Viral

Goa ZP Election: बहुतांश ठिकाणी ‘झेडपीं’ची पळापळ सुरू, डिचोली वाढणार रंगत; पेडणे तालुक्यातून अनेकांचा पत्ता कट!

SCROLL FOR NEXT