GMC क्षेत्रातून हटवलेले फळविक्रेते  दैनिक गोमन्तक
गोवा

Goa: गोमेकॉ बाहेर फळविक्रेते व पोलिसांमध्ये तणाव

निदर्शने करणाऱ्या फळविक्रेत्यांसह स्थानिक नेते पोलिसांच्या ताब्यात

Dainik Gomantak

गोवा वैद्यकीय महाविद्यालायाच्या (GMC) बाहेर गाडे लावणाऱ्यांवर फळविक्रेत्यांवर (Fruit Seller) पुन्हा पोलिसांनी (Goa Police) कारवाई केली. धंद्यासाठी नवी जागा न दिल्याने व पूर्वीच्या विक्रेत्यांना डावलून नव्या विक्रेत्यांची जागेची व्यवस्था केल्याने, विक्रेते आणि पोलिस यांच्यात तणाव निर्माण झाला. सोमवारी सकाळी गोमेकॉच्या परिसराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटाही यावेळी पाहायला मिळाला.

जीएमसी बाहेरील विक्रेत्यांना पोलिसांच्या मदतीनं हटवले गेले. यावेळी रामराव वाघ आणि रामा काणकोणकर यांनी पोलिसांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु , त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजीचे सूर उमटत होते. विक्रेत्यांचे गाड्यांवर या अगोदरही कारवाई केली गेली होती. त्यावेळी दुसरीकडे जागा देऊ, असे आश्वासनही देण्यात आले होते. दरम्यान, जुन्या विक्रेत्यांचे पुनर्वसन झाले नसताना नव्या विक्रेत्यांना जागा देण्यात आली, त्यामुळे जुन्या विक्रेत्यांची नाराजी झाली. यावेळी निदर्शनं करताना स्थानिक नेत्यांसह जुन्या विक्रेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

Dharbandora: 'हे आदिवासी संस्कृतीचा कणा असलेले जंगल, इथे IIT नको'! धारबांदोडा ग्रामस्थ ठाम; भूसंपादनास तीव्र आक्षेप

School Paperless Exams: पेपर विरहित परीक्षा घेणारे 'गोवा' ठरेल पहिले राज्य! हेगडेवार विद्यालयात यशस्वी प्रयोग

Damodar Saptah: जय जय रामकृष्ण हरी! दामोदर भजनी सप्ताह; 24 तास साखळी पद्धतीने भजनाची परंपरा

SCROLL FOR NEXT