Religious trust elections in Goa  Dainik Gomantak
गोवा

Temple Elections: गोव्‍यात मंदिर व्‍यवस्‍थापन समितीच्या निवडणूकांची उत्सुकता! इच्छुकांचे लॉबिंग, 'काही' वाद न्‍यायालयात

Goa temple committee election 2025: दक्षिण गोव्‍यात अटीतटीच्‍या होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात असून त्‍यात रामनाथी येथील श्री रामनाथ देवस्‍थानाचा समावेश आहे.

Sameer Panditrao

Goa temple committee election 2025

मडगाव: गोव्‍यातील मंदिरांच्‍या व्‍यवस्‍थापन समित्‍या निवडण्‍यासाठी रविवार ९ रोजी निवडणूक होणार असून या काही देवळांच्‍या निवडणुकीचे वाद न्‍यायालयात पोचले आहेत, तर काही जणांनी मामलेदार कार्यालयात तक्रारी दाखल केल्‍या आहेत. ही सर्व पार्श्‍वभूमी पाहता रविवारी होणारी निवडणूक वादग्रस्‍त तसेच अटीतटीच्‍या होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. इच्‍छुक उमेदवारांनी आत्तापासूनच त्‍यासाठी लॉबिंग करण्‍यास सुरुवात केली आहे.

जांबावली येथील प्रसिद्ध अशा श्री रामनाथ दामोदर देवस्‍थान निवडणुकीचा वाद मुंबई उच्‍च न्‍यायालयापर्यत पोचण्‍याची घटना घडली आहे. या निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या महाजनांच्‍या मतदार यादीतील काही नावे गाळल्‍याचा दावा करून या देवस्‍थानाचे महाजन ओंकार कामत सांबारी यांनी उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती.

आज शुक्रवारी यावर सुनावणी होऊन मागच्‍या निवडणुकीच्‍यावेळी जी मतदार यादी होती, ती तसेच त्‍यानंतर नोंद झालेल्‍या महाजनांना मतदान करण्‍याचा अधिकार असल्‍याचा निवाडा आज न्‍यायालयाने दिल्‍याने या वादावर तात्‍पुरता पडदा पडला आहे, मिळत असलेल्‍या माहितीप्रमाणे- यावेळी या देवस्‍थानाच्‍या अध्‍यक्षपदासाठी विद्यमान समिती अध्‍यक्ष मंजुनाथ दुकळे आणि माजी अध्‍यक्ष प्रकाश कुंदे हे एकमेकांच्‍या समोर उभे ठाकणार आहेत.

केपे तालुक्‍यातील श्री शांतादुर्गा बाळ्‍ळीकरीण या देवस्‍थानाच्‍या निवडणुकी संदर्भातही या देवस्‍थानाचे महाजन मंदार फळदेसाई यांनी केपेचे मामलेदार नाथन आफोन्‍सो यांच्‍यासमोर याचिका दाखल केली असून सध्‍याच्‍या व्‍यवस्‍थापन समितीच्‍या काही सदस्‍यांवर गैरकारभाराचा ठपका ठेऊन त्‍यांना निवडणुकीस उभे राहण्यासाठी किंवा मतदान करण्‍यासाठी मज्‍जाव करावा, अशी मागणी केली आहे.

केपेचे मामलेदार आफोन्‍सो यांच्‍याशी संपर्क साधला असता अशा प्रकारचा अर्ज कालच आपल्‍या कार्यालयात दाखल करण्‍यात आलेला आहे.

मात्र अशी मागणी तक्रारदाराला करायची असल्‍यास त्‍याने प्रशासकीय लवादाकडे आपला अर्ज दाखल करावा लागेल असे ते म्‍हणाले. रविवारी निवडणूक ठरल्‍याप्रमाणे होईल असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. रविवारी केपे तालुक्‍यात एकूण १६ देवस्‍थानाच्‍या निवडणुका घेतल्‍या जाणार आहेत. अजूनही कित्‍येक मंदिरातील चित्र स्‍पष्‍ट झालेले नाही. निवडणुकीला कोण उभे राहील आणि कोण माघार घेतील याचे नेमके चित्र रविवारी म्‍हणजे मतदानाच्‍याच दिवशी स्‍पष्‍ट होईल, असे सांगण्‍यात येते.

अटीतटीच्या लढती!

दक्षिण गोव्‍यात अटीतटीच्‍या होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात असून त्‍यात रामनाथी येथील श्री रामनाथ देवस्‍थानाचा समावेश आहे. अध्‍यक्ष वल्‍लभ कुंकळयेकर यांच्‍या विरोधात माजी अध्‍यक्ष कृष्‍णा पै आंगले हे उभे आहेत. कवळे श्री शांतादुर्गा देवस्‍थानाच्‍या निवडणुकीत ॲड. वल्‍लभ कुडचडकर यांच्‍या अध्‍यक्षतेखालील पॅनलच्‍या विरोधात रिद्धेश सुखठणकर यांनी पॅनल उभे केले आहे. नागेशी देवस्‍थानासाठी विद्यमान अध्‍यक्ष दामोदर भाटकर आणि संजय प्रियोळकर यांच्‍या पॅनलमध्‍ये लढत होणार आहे. शिरोडा येथील श्री कामाक्षी देवस्‍थानाच्‍या निवडणुकीत विद्यमान अध्‍यक्ष राजन कामत बुडकुले निवडणूक लढवित असून त्‍यांच्‍या विरोधात श्रीधर कामत बुडकुले यांचे पॅनल निवडणुकीत उतरण्‍याचे संकेत मिळत आहेत. मात्र अजुनही विरोधी पॅनल जाहीर करण्‍यात आलेले नाही. पर्वत-पारोडा येथील श्री चंद्रेश्‍वर भूतनाथ देवस्‍थानाच्‍या लढतीत विद्यमान अध्‍यक्ष शशांक देसाई यांच्‍या विरोधात किशोर गावस देसाई हे उभे रहाणार असून काणकोणच्‍या प्रसिद्ध अशा श्री मल्‍लिकार्जुन देवस्‍थानाच्‍या निवडणुकीत या देवस्‍थानाचे माजी अध्‍यक्ष राजन देसाई यांच्‍या विरोधात विजयनाथ भैरोली यांनी आव्‍हान उभे केले आहे.

बिनविरोध अध्‍यक्ष

काही देवस्‍थानाच्‍या लढती अटीतटीच्‍या होण्‍याची शक्‍यता असल्‍या तरी काही देवस्‍थानात अध्‍यक्ष बिनविरोध निवडून येण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जाते. यात वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवालयाचा समावेश असून प्रसिद्ध उद्योजक कमलाक्ष रामा नाईक हे बिनविरोध निवडून येण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. ढवळी-फोंडा येथील वामनेश्‍वर देवालयाचे अध्‍यक्ष म्‍हणून शशांक खरंगटे हे पुन्‍हा निवडून येण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जाते. फातर्पेच्‍या प्रसिद्ध अशा श्री शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण देवस्‍थानाच्‍या अध्‍यक्षपदासाठी विनोद देसाई हे रिंगणात उतरतील असे सांगण्‍यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT