Goa weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: लाहीलाही! मार्चमधील तिसऱ्या क्रमांकाच्या कमाल तापमानाची नोंद; वायुप्रवाह बदलांमुळे उष्मा अधिक

Goa Weather In March: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा ३७ अंशांवर पोहोचला, त्यामुळे नागरिक हैराण झाले.

Sameer Panditrao

Goa Summer Updates

पणजी: राज्यात फेब्रुवारी अखेरीपासून मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत असून नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील वाऱ्याच्या प्रवाहातील बदलांमुळे हा उष्मा जाणवत असून यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाच्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली असल्याचे गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

यंदा राज्यात उष्म्याच्या झळा अधिकच लवकर जाणवायला सुरुवात झाली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा ३७ अंशांवर पोहोचला, त्यामुळे नागरिक हैराण झाले. मार्चच्या सुरुवातीपासून उष्मा कायम असल्याने त्याचा तडाखा नागरिकांना बसला आहे.

किनारी भागात या उष्म्याचा प्रभाव अधिक जाणवत आहे. दुपारी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उष्म्याचा प्रभाव अधिक असतो. रात्री काही भागात थंडी तर किनारी भागात उष्मा जाणवतो; परंतु कमाल तापमानात काही प्रमाणात घट होते. नागरिकांनी या वाढत्या उष्म्यापासून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तापमानवाढीची शक्यता

आज राज्यात कमाल ३३.३ अंश सेल्सिअस तर किमान २४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली, जी सामान्य तापमानाच्या तुलनेत दोन अंशांनी अधिक आहे. पुढील दोन दिवस राज्यात तापमानाचा पारा कमाल ३६ व किमान २४ अंशादरम्यान राहणार असल्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISI च्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT