Award winning teachers and dignitaries Dainik Gomantak
गोवा

Goa: शिक्षकांनी अद्ययावत राहावे : दशरथ परब

निवृत्त मराठी अध्यापक व आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचा पणजीत सत्कार व गौरव झाला.

Bhushan Aroskar

पेडणे: शिक्षकांनी मुलांना ज्ञान (Knowledge) देण्याच्या नवीन पद्धती अंमलात आणल्या पाहिजेत. आजची मुले नवनवीन गोष्टी लगेचच आत्मसात करतात. त्यामुळे शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्‍यिक व इन्स्‍टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब यांनी केले. अखिल गोवा मराठी माध्यमिक शिक्षक महासंघ गोवा (Goa) आयोजित निवृत्त मराठी अध्यापक व आदर्श शिक्षक (The ideal teacher) राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक यांच्या पणजीत आयोजित केलेल्‍या सत्कार व गौरव सोहळ्यात प्रमुख अतिथी या नात्याने ते बोलत होते. सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष गोपाळ सावंत, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व निवृत्त शिक्षक अरविंद सायनेकर, उपाध्यक्षा वेदश्री पित्रे, सचिव प्रिया टांकसाळी, खजिनदार राजमोहन शेट्ये, सदस्य प्रशांत मांद्रेकर, विजयशेट मांद्रेकर यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना गोपाळ सावंत यानी महासंघाच्या सर्व सदस्याना संघटित राहून कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी अरविंद सायनेकर, दयानंद नाईक, अनिल बोंद्रे, अरुणा दिलखुश शेट, संगीता नाईक या निवृत्त शिक्षकांचा तसेच २०१९-२० चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक गोपाळ सावंत, सुदेश वझे यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात प्रार्थनेने व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक प्रशांत मांद्रेकर, प्रमुख अतिथींचा परिचय राजमोहन शेट्ये यांनी केला. सत्कारमूर्ती व गौरवमूर्तींच्या प्रदीर्घ सेवेची माहिती सभागृहाला विजय शेट मांद्रेकर, संदीप गावस, सचिन पिळर्णकर, सीमा बनकर, गौतमी गवस, वेदश्री पित्रे, श्रीनिवास पाटील यांनी करून दिला. गौतमी गावस व सीमा बनकर यांनी मान्यवरांना पुष्पे प्रदान केली. अनिल पिळर्णकर यांनी सहकार्य केले. प्रिया टांगसाळी यांनी सूत्रसंचालन केले. सत्कारमूर्तींच्यावतीने अरविंद सायनेकर यांनी आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे ऋणनिर्देशन वेदश्री पित्रे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT