Teacher Dainik Gomantak
गोवा

Goa TET 2025: सुवर्णसंधी! शिक्षक होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, गोवा 'टीईटी'चे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Goa TET Exam Schedule: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, GTET - डिसेंबर 2025 ही परीक्षा कम्पुटर-आधारित चाचणी पद्धतीने घेतली जाईल.

Manish Jadhav

Goa TET Exam Schedule: शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकपदासाठी आवश्यक असलेली गोवा शिक्षक पात्रता परीक्षा (Goa Teachers Eligibility Test - GTET) डिसेंबर 2025 च्या आयोजनाची जबाबदारी गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सोपवण्यात आली आहे.

शिक्षक (Teacher) होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, GTET - डिसेंबर 2025 ही परीक्षा कम्पुटर-आधारित चाचणी (Computer-Based Test - CBT) पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेचे वेळापत्रक आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात आली.

परीक्षा कधी आणि कुठे?

गोवा टीईटी परीक्षा दोन दिवसांमध्ये घेतली जाणार आहे.

परीक्षा तारीख: मंगळवार, 09 डिसेंबर 2025 आणि बुधवार, 10 डिसेंबर 2025.

वेळ: दोन्ही दिवशी परीक्षा दुपारी 3.00 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.

ही परीक्षा गोव्यातील दोन केंद्रांवर आयोजित केली जाईल:

उत्तर गोवा (North Goa): सेंट झेवियर्स हायर सेकंडरी स्कूल, म्हापसा.

दक्षिण गोवा (South Goa): रोझरी हायर सेकंडरी स्कूल, नावेली, सासष्टी.

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी गोवा शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.gbshse.in) उपलब्ध असलेल्या GTET पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात: 01 नोव्हेंबर 2025

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 15 नोव्हेंबर 2025 (सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत)

बायोमेट्रिक कॅप्चर आणि प्रशिक्षण

परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांना परीक्षा देण्यापूर्वी बायोमेट्रिक कॅप्चर आणि आवश्यक प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे.

तारीख: 05 डिसेंबर 2025 आणि 06 डिसेंबर 2025.

वेळ आणि ठिकाण: दुपारी 2.00 वाजता, उमेदवारांनी निवडलेल्या संबंधित परीक्षा केंद्रावर हे प्रशिक्षण आयोजित केले जाईल.

महत्त्वाची सूचना: दिव्यांग उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. परीक्षेसंबंधीची सविस्तर माहिती आणि माहिती पुस्तिका (Information Bulletin) गोवा बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT