Goa TCP Department Dainik Gomantak
गोवा

Goa TCP Department: 'टीसीपी' खात्यातील कर्मचाऱ्याचे निलंबन, तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सरकारची कारवाई

Goa TCP Employee Suspended: मुख्य नगरनियोजक कार्यालयाने २५ जून रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सूर्यकांत शिंदे यांच्याविरोधात सरकारकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: नगर व ग्रामनियोजन (टीसीपी) विभागाच्या डिचोली तालुका कार्यालयात कार्यरत असलेले मल्टीटास्किंग कर्मचारी सूर्यकांत शिंदे यांना विविध तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत सरकारने शिस्तभंगविषयक चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्य नगरनियोजक कार्यालयाने २५ जून रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सूर्यकांत शिंदे यांच्याविरोधात सरकारकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी आणि तपास प्रक्रियेची निष्पक्षता कायम राखण्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय नागरी सेवा (वर्गीकरण, नियंत्रण व अपील) नियम, १९६५ अंतर्गत नियुक्ती प्राधिकाऱ्याने हा निर्णय घेतला असून चौकशी पूर्ण होईपर्यंत शिंदे यांना सेवेतून दूर ठेवण्यात येणार आहे. निलंबनाचा आदेश तत्काळ लागू करण्यात आला आहे.

याशिवाय, निलंबनाच्या कालावधीत सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांनी मुख्यालय क्षेत्र सोडू नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. चौकशीदरम्यान आवश्यक कागदपत्रे, माहिती व सहकार्य उपलब्ध राहावे, यासाठीही अट घालण्यात आली असल्याचे समजते.दरम्यान, शिंदे यांच्याविरोधातील तक्रारींचे स्वरूप नेमके काय आहे, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

मात्र प्राप्त तक्रारींची सखोल चौकशी करून त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.या कारवाईमुळे नगर व ग्रामनियोजन विभागात खळबळ उडाली असून प्रशासनाने शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारीच्या बाबतीत कठोर भूमिका घेतल्याची चर्चा सुरू आहे. आता चौकशी अहवालानंतर या प्रकरणाचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

आदेशातील प्रमुख बाबी

सूर्यकांत शिंदे यांचे तत्काळ प्रभावाने निलंबन

विविध तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शिस्तभंग चौकशी सुरू

चौकशी पूर्ण होईपर्यंत सेवेतून राहणार दूर

मुख्यालय क्षेत्र सोडण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT