Taxis in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: टॅक्सी चालकांच्या आंदोलनाला यश; 'मोपा’वर 1,300 जणांना मिळणार व्यवसाय

‘मोपा’वर टॅक्सी काऊंटरसह इतर मागण्या मान्य करण्यात आल्या, अशी माहिती ग्रीन फिल्ड मोपा टॅक्सी असोसिएशनचे नेते भास्कर नारुलकर यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

Goa Taxi: मोपा विमानतळावर पेडणेतील टॅक्सीधारकांना काऊंटर द्यावा, यासह आमच्या बहुतांश मागण्या पूर्ण झाल्या असून आता केवळ औपचारिकता बाकी असल्याची माहिती ग्रीन फिल्ड मोपा टॅक्सी असोसिएशनचे नेते भास्कर नारुलकर यांनी दिली.

काल पेडण्याचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, पेडणे वाहतूक कार्यालयाचे साहाय्यक अधिकारी कमलाकर कारापूरकर यांच्यासह भास्कर नारुलकर, ॲड. जितेंद्र गावकर, ॲड. प्रसाद शहापूरकर व ‘मिशन फॉर लोकल’चे अध्यक्ष राजन कोरगावकर, उदय महाले यांनी जीएमआर कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी मोपा विमानतळावर ब्लू कॅप काऊंटर व पार्किंग जागेची पाहणी केली.

संध्याकाळी पेडणे वाहतूक कार्यालयात या अधिकाऱ्यांसोबत ब्ल्यू कॅब टॅक्सीच्या रंगासोबत व इतर काही विषयांवर चर्चा झाली. या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या सर्व संस्था, प्रसारमाध्यमे, पत्रकार, सरकारी अधिकारी यांचे नारुलकर यांनी आभार मानले.

1,300 जणांना मिळणार व्यवसाय

आमच्या संघटनेने केलेल्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या असून मोपा विमानतळावर सुमारे 1,300 टॅक्सी सामावून घेतल्या जातील. त्यात मोपा विमानतळासाठी जमीन गेलेल्या सात ग्रामपंचायत क्षेत्रातील टॅक्सीधारकांना प्राधान्य असेल. शिवाय पेडणे तालुक्यातील इच्छुक टॅक्सीधारकांनाही सामावून घेतले जाईल. मागण्या मान्य झाल्याने आता आंदोलनही संपले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT