South Goa Resort Incident Dainik Gomantak
गोवा

'आम्ही पुढच्या वेळी फुकेटला जाऊ',पर्यटकांचा गोव्याला रामराम, टॅक्सी माफियांची दादागिरी; Video Viral

Goa Taxi Mafia Viral Video: आरोसी येथील रिसॉर्टबाहेर ही घटना घडली, जिथे खासगी वाहनाने विमानतळावर जाण्यासाठी निघालेल्या कुटुंबाला स्थानिक टॅक्सी चालकांच्या एका गटाने अडवले

Akshata Chhatre

Tourists Harassed in Goa: दक्षिण गोव्यातील एका रिसॉर्टबाहेर स्थानिक टॅक्सी चालकांनी केलेल्या कथित गैरवर्तन आणि त्रासामुळे एका कुटुंबाचा गोव्यातील सुट्टीचा अनुभव पूर्णपणे खराब झाला. आरोसी येथील रिसॉर्टबाहेर ही घटना घडली, जिथे खासगी वाहनाने विमानतळावर जाण्यासाठी निघालेल्या कुटुंबाला स्थानिक टॅक्सी चालकांच्या एका गटाने अडवले.

या संतप्त पर्यटकांनी दावा केला की, टॅक्सी चालकांनी त्यांची खासगी कार रोखली आणि जवळपास तिप्पट भाडे देऊन त्यांच्याच टॅक्सीपैकी एक टॅक्सी भाड्याने घेण्याची जबरदस्ती केली. या वादावादीचा आणि गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे गोव्यातील टॅक्सी चालकांची मनमानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

'ब्लॅकमेल' आणि 'फुकेट'चा इशारा

या कुटुंबाने टॅक्सी चालकांच्या वर्तनाचे वर्णन "ब्लॅकमेल आणि पर्यटकांसाठी भीतीदायक वातावरण" असे केले आहे. शांततापूर्ण वातावरणात सुरू झालेल्या या सुट्टीचा शेवट तणावात आणि भीतीमध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेमुळे अत्यंत दुखावलेल्या कुटुंबातील एका सदस्याने आपली तीव्र निराशा व्यक्त करताना म्हटले, "आम्ही पुन्हा गोव्याला येण्यापूर्वी दोनदा विचार करू. पुढच्या वेळी आम्ही थायलंडमधील फुकेटला जाऊ कारण ते स्वस्त आहे, लोकं तिथे चांगलं वागतात"

पोलिसांत तक्रार आणि पर्यटन क्षेत्राची चिंता

घडल्या प्रकारानंतर खासगी वाहनाच्या मालकाने तातडीने वर्णा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. रिसॉर्टमधून पाहुण्यांना घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आपल्या चालकाला स्थानिक टॅक्सी चालकांनी रोखले आणि धमकावले, असा आरोप त्यांनी केला आहे.

पर्यटन क्षेत्रातील भागधारकांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, अशा वारंवार होणाऱ्या घटनांमुळे गोव्याची एक स्वागतशील ठिकाण म्हणून असलेली प्रतिमा गंभीरपणे खराब होऊ शकते, विशेषत: आता सणासुदीचा आणि चार्टर हंगाम सुरू झाला असताना हा प्रकार अधिक लाजिरवाणा ठरला आहे. पर्यटन क्षेत्रातील लोकांनी 'डिजिटल टॅक्सी सोल्यूशन्स' (उदा. ॲप-आधारित टॅक्सी सेवा) तातडीने लागू करण्याची विनंती सरकारला केली आहे, जेणेकरून राज्याची आणखी बदनामी होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT