Taxi Driver Protest Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Driver Protest: राज्याबाहेरील टॅक्सी सेवेत आणि स्थानिक मात्र आंदोलनात! होतोय तिसऱ्याचाच लाभ

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Taxi Issue

पेडणे: सरकार व स्थानिक टॅक्सीधारकांच्या आंदोलनात फायदा मात्र तिसऱ्याचाच होत आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या गोवा माईल्स, मेगा कॅप, ताज इंडिया टूर आदी राज्याबाहेरील (दिल्लीच्या) टॅक्सी व कदंब महामंडळाच्या बसगाड्या वाहतूक करत आहेत. तर मोपा विमानतळ प्रकल्पासाठी जमीन दिलेले स्थानिक टॅक्सीधारक मात्र आपल्या मागण्यासांठी पेडणे येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत.

स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसाठी विमानतळावर काऊंटर हवा, पार्किंग शुल्क कमी करावे, विमानतळावर भाड्याने दिल्या जाणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करावी, ॲप टॅक्सींचे विमानतळावरील काऊंटर बंद करावे, महामार्ग ते विमानतळ या रस्त्याचा टोल रद्द करावा, टोल रस्ता होण्याआधीचा रस्ता खुला ठेवावा, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन गुरवार, २२ रोजी सकाळपासून सुरू झालेले आहे.

शुक्रवार, २३ रोजी दुपारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आंदोलकांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण केवळ दहाजणांनाच मुख्यमंत्र्यांची भेट घेता येईल असे सांगण्यात आल्याने हे सर्वजण माघारी आले. त्यानंतर सायंकाळी परत काहीजण मुख्यमंत्र्यांना भेटले. मात्र, चर्चेनंतर बोलणे फिस्कटले.

मुख्यमंत्र्यांनी आज भेटावे!

सोमवार, २६ रोजी मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलणी करण्यासाठी आंदोलकांना बोलाविले आहे. यामुळे या टॅक्सीधारकांनी आपले ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हृदयात काही दयामाया असेल तर त्यांनी सोमवारच कशाला उद्या रविवारीही संबंधित अधिकारी व इतरांना बोलावून आमच्या या मागण्या सोडवाव्यात, असे रामा वारंग, ॲड. अमित सावंत, आनंद गावस आदींनी सांगितले.

‘ॲप’आधारित टॅक्सी आणा

टॅक्सीधारकांचा प्रश्‍न लवकरात लवकर सोडवावा, अन्यथा राज्यातील पर्यटन लयाच्या दिशेने मार्गक्रमण करेल. तो आणखी धक्का आम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे राज्यात सर्वत्र ‘ॲप’आधारित टॅक्सींना परवानगी द्यावी, अशी मागणी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीने (जीसीसीआय) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केलेली आहे.

‘जीसीसीआय’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर, दक्षिण विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, किनारे अशा ठिकाणी टॅक्सींचा व्यवसाय चालतो. हा व्यवसाय काही दशकांपासून चालत आहे, त्यामुळे टॅक्सीचालकांचा प्रश्‍न आताच सोडवावा लागेल. आम्ही सर्व सहकारी गोवा टॅक्सीचालकांना उपलब्ध कोणत्याही ॲपआधारित टॅक्सी सेवेमध्ये जाण्याचे आवाहन करतो. कारण तंत्रज्ञान हे भविष्य आहे आणि ते मागे राहू नयेत, असे आम्हाला वाटते.

अतिथींची काळजी घ्यावी!

सर्व पक्षांनी एकत्र यावे आणि राजकारण बाजूला ठेवून या समस्येच्या निराकरणासाठी पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा जीसीसीआयने व्यक्त केली आहे. परवडणारे ॲप आधारित आणि ऑनलाईन सेवा ही काळाची, भविष्याची गरज आहे. चेंबरने सर्व आस्थापनांना, सर्व टॅक्सींना समान सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच या आस्थापनांनी दबावाला बळी पडू नये आणि त्यांच्या आस्थापनांना भेट देणाऱ्या व राहणाऱ्या अतिथींची गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन जीसीसीआयने केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजुणेत थार गाडीची दुचाकीला धडक; तिघेजण गंभीर जखमी

ISL 2024-25: आगामी लढतीसाठी FC Goa संघात होणार बदल? मार्केझ यांनी दिले संकेत

Konkan Railway: धावत्या रेल्वेतून कोसळली विद्यार्थिनी, RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वचावली Video

Mopa Airport: ...तर सरपंचांनी राजीनामे द्यावेत! ‘मोपा’तील नोकऱ्यांवरुन जनसंघटना आक्रमक

Mandrem: सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मांद्रेत ग्रामस्थांच्या चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT