Goa taxi app Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi App: अ‍ॅप-आधारित टॅक्सी सेवा महत्वाची! चेंबर ऑफ कॉमर्सकडून स्वागत; उद्योगक्षेत्रांना दिलासा मिळणार असल्याचा दावा

Goa Chamber Of Commerce: गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजने पत्रकात म्हटले आहे की, नियमनबद्ध अ‍ॅप-आधारित टॅक्सी सेवा ही आता लक्झरी नसून अपरिहार्यता बनली आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्य सरकारने जाहीर केलेल्या गोवा वाहतूक संयोजक (ट्रान्सपोर्ट अ‍ॅग्रिगेटर) मार्गदर्शक तत्त्वे २०२५ यांचे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजने स्वागत करताना त्याला वेळेची गरज आणि राज्याच्या गतिशीलता प्रणालीसाठी एक प्रगतशील टप्पा ठरवले आहे.

"डिजिटल सुविधा, विश्वसनीयता आणि वाहतुकीतील सुलभता या आधुनिक व्यवसायासाठी केवळ गरजा नाहीत, तर त्या उत्पादनक्षमतेचे मुख्य आधार आहेत असे वा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज म्हणणे आहे.

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजने पत्रकात म्हटले आहे की, नियमनबद्ध अ‍ॅप-आधारित टॅक्सी सेवा ही आता लक्झरी नसून अपरिहार्यता बनली आहे.

चेंबरच्या मते या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये डिजिटल नवप्रवर्तनाला प्रोत्साहन देतानाच स्थानिक चालकांच्या हिताचीही योग्य तजवीज करण्यात आली आहे. चालकांना शासकीय दराने भाडे दिले जाणे, वेळेवर पैसे मिळणे, आरोग्य विमा आणि वाहनांसाठी अनुदान अशा तरतुदी आर्थिक आणि सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवतात.

सर्वच उद्योगक्षेत्रांना मिळणार दिलासा

पर्यटन, उत्पादन, रिअल इस्टेट, किरकोळ व्यवसाय, लॉजिस्टिक्स आणि सेवा क्षेत्र अशा सर्व क्षेत्रांतील व्यावसायिकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित व विश्वसनीय प्रवासाची गरज भासते.

अ‍ॅप-आधारित टॅक्सी सेवा केवळ प्रवाससुलभता वाढवते असे नाही, तर कामकाजात कार्यक्षमतेला चालना देत, गुंतवणुकीस पोषक असे वातावरण तयार करते.

शेअर मोबिलिटीला चालना...

शेअर मोबिलिटीला चालना देऊन खासगी वाहनांवरील अवलंबन कमी करणे, वाहतूक कोंडी टाळणे आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे या शाश्वत शहरी विकासाच्या दृष्टीनेही या धोरणाचे स्वागत करण्यात आले आहे.

‘वेळेवर अंमलबजावणी आवश्यक’

या मार्गदर्शक तत्त्वांची वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन चेंबरने केले असून अ‍ॅग्रिगेटर कंपन्या, चालक आणि नागरिक यांनी या प्रणालीच्या यशासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोव्यातील भविष्यातील आर्थिक प्रगती आणि जीवनमान उंचावण्यासाठी एक पारदर्शक, न्याय्य आणि तंत्रज्ञानाधिष्ठित वाहतूक प्रणाली उभारणे ही आता वेळेची गरज बनली आहे, असे चेंबरचे स्पष्ट मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT