Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: राज्यातील 1849 डिजीटल टॅक्सी परवाने रद्द

गोवा डिजीटल मीटर्सप्रकरणी सरकारतर्फे माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात टॅक्सी (Taxi) चालकांनी डिजिटल मीटर्स (Degital Meter's) लावण्याबाबत चालढकलपणा चालविला असला तरी मुंबई उच्च न्यायालयाच्या (High Court) गोवा खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. ज्या टॅक्सी चालकांचा परमिट परवाना रद्द झाला आहे तो संपूर्ण टॅक्सींना डिजिटल मीटर्स बसविण्यात येईपर्यंत मागे घेण्यात येऊ नयेत अशी सूचना करण्यात आली आहे. आतापर्यंत १८४९ टॅक्सींचे परमिट परवाना रद्द झाले आहेत अशी माहिती खंडपीठाला देण्यात आली.

राज्यातील टॅक्सींना डिजिटल मीटर्स बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी बहुतेक टॅक्सी चालकांना आडमुठे धोरण अवलंबून त्याकडे दुर्लक्ष केले आहे. काही टॅक्सी मालक संघटनांनी डिजिटल मीटर्सऐवजी पर्यायी ॲप सेवा व इतर कंपन्यांचे मीटर्स बसवण्यास मान्यता द्यावी यासाठी वाहतूक खात्याकडे अर्ज करण्यात आले आहेत. गोवा खंडपीठात त्यासंदर्भातच्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे टॅक्सी चालकही संभ्रमात पडले आहेत.

वाहतूक खात्याने डिजिटल मीटर्ससंदर्भात आज गोवा खंडपीठाला दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १२४७ टॅक्सी चालकांनी डिजिटल मीटर्स बसविले आहेत. १८४९ टॅक्सी चालकांनी मीटर्स बसविले नाहीत त्यामुळे त्यांचे परमिट रद्द करण्यात आले आहे. त्यापैकी ६५० जणांनी परमिट रद्द झाल्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्यासाठी अर्ज केले आहेत. १९६२ टॅक्सी चालकांनी मीटर्ससाठी नोंदणी केली आहे

व मीटर्स बसविणे अजूनही बाकी आहे. यावेळी गोवा खंडपीठाने हस्तक्षेप करत ज्या टॅक्सींचे परवाने रद्द झाले आहेत व ते मागे घ्यावे यासाठी अर्ज केले आहेत त्यावर निर्णय घेऊ नये, असे स्पष्ट केले. टुर्स अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवातर्फे अवमान याचिका सादर करण्यात आली आहे त्यावर आज सुनावणी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT