Water Shortage In Taleigao Dainik Gomantak
गोवा

Water Shortage In Taleigao: 'बांधकाम प्रकल्पांना पाणीपुरवठा मात्र घरगुती वापरासाठी पाणी टंचाई'; ग्रामस्थ आक्रमक

ताळगाव ग्रामसभेत पडसाद : दोना पावला येथे टाकीसाठी प्रक्रिया

गोमन्तक डिजिटल टीम

Water Shortage In Taleigao पणजी- ताळगाव परिसरातील बहुमजली बांधकाम प्रकल्पांना देण्यात येत असलेल्या परवान्यांमुळे अनियमित पाणीपुरवठा, कचरा व सांडपाण्याच्या समस्येबाबत ग्रामस्थांनी आज ताळगाव ग्रामसभेत प्रश्‍न उपस्थित केले. पाण्याची समस्या सुटेपर्यंत नव्या प्रकल्पांना पंचायतीने परवाने न देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

दोना पावल येथे नव्याने पाण्याची टाकी बांधण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा खात्याकडे पाठवला असून त्याच्या निविदा प्रक्रियेचे काम सुरू आहे. टाकी बांधकाम पूर्ण होताच ही समस्या सुटेल, असे आश्‍वासन सरपंच जानू रोझारिओ यांनी दिले.

मागील ग्रामसभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यासाठी त्याची माहिती पंचायत सचिव गौरेश पेडणेकर यांनी वाचण्यास सुरुवात केली असता त्यामध्ये अनेक मुद्दे समावेश न केल्याबद्दल सिसिल रॉड्रिग्ज, भूपेश प्रभुदेसाई तसेच आल्बेर्टिना आल्मेदा यांनी हरकत घेतली.

ताळगाव परिसरात अनेक विहिरींचे पाणी दूषित तसेच त्या कोरड्या पडत आहेत. त्यासंदर्भात पंचायतीने जलस्रोत खात्याशी संपर्क साधून तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्याचा या इतिवृत्तात समावेश झालेला नाही.

पंचायतीचा भूवापर आराखडा उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाकडून घेण्याचे ठरवले होते. मात्र, त्याचाही उल्लेख नाही. त्यामुळे इतिवृत्तामध्ये या विषयांचा समावेश करण्याची ग्वाही रोझारिओ यांनी दिली.

पंचायत परिसरातील मलनिस्सारणच्या जोडण्यांचे कनेक्शन केले नसल्याने अनेक इमारत संकुलांच्या ठिकाणी सांडपाणी निचऱ्याच्या टाक्यांमधून घाण पाणी वाहत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

कामराभाटमध्ये दरवर्षी पाऊस पडल्यावर खाडीतील पाणी तेथील झोपड्यावजा घरांमध्ये घुसते. मात्र, पंचायतीने नाल्यातील गाळ उपसण्याचे काम हाती घेतल्याने गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच या भागात पाणी झोपड्यांमध्ये घुसण्याचा प्रकार घडला नाही, त्याबद्दल कामराभाट ग्रामस्थांनी पंचायतीचे अभिनंदन केले.

ग्रामसभेची प्रसिद्धी करा!

ग्रामसभेची वृत्तपत्रात जाहिरात देण्याबरोबरच ती सार्वजनिक ठिकाणी तसेच त्या पंचायत क्षेत्रातील मंदिरे, चर्च तसेच मस्जिद असलेल्या ठिकाणी त्याचे बॅनर्स लावावेत, या व्यतिरिक्त पंचायतीने ग्रामसभेला अधिकाधिक ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, यासाठी व्हॉट्स ॲप मेसेज किंवा ईमेलवरून माहिती मतदारांना द्यावी. त्यामुळे लोकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी ग्रामसभेला उपस्थित राहता येईल, असा मुद्दा सिसिल रॉड्रिग्स यांनी मांडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT