स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक यांनी स्वामी विवेकानंद केंद्राच्या दालनात समई प्रज्वलित करुन स्वामी विवेकानंदांच्या फोटोला फुले अर्पण केली.  Dainik Gomantak
गोवा

Goa: स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेतून राष्ट्रप्रेमी युवक तयार होणे गरजेचे

रवीन्द्र भवन मडगाव येथे स्वामी विवेकानंद पुण्यतिथी साजरी, स्वामी विवेकानंदांची शिकवण युवकांर्यंत पोहोचविणे व त्यांच्या प्रेरणेतून देशात राष्ट्रप्रेमी युवक तयार होणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांचे पुण्यस्मरण करणे हे प्रत्येक भारतवासियांचे कर्तव्य आहे. त्यांची ख्याती साता समुद्रा पार पोहचली आहे. त्यांची शिकवण युवकांर्यंत पोहोचविणे  व त्यांच्या प्रेरणेतून (Inspiration) देशात राष्ट्रप्रेमी युवक (Patriotic youth) तयार होणे गरजेचे असल्याचे रवीन्द्र भवन मडगावचे अध्यक्ष दामू नाईक यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी दिनी आयोजित कार्यक्रमात सांगितले. 

रवीन्द्र भवन मडगाव येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या दालनात समई प्रज्वलित करुन त्यांच्या फोटोला फुले अर्पण केली. 

देशाची उज्वल परंपरा, संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी युवकांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे उद्भवलेली गंभीर परिस्थिती पुर्वपदावर आल्यावर या केंद्रातर्फे युवकांना प्रेरणादायी ठरेल असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील असेही दामू नाईक यांनी सांगितले.

या कार्यक्रमात रवीन्द्र भवन मडगावच्या सदस्य सचिव संध्या कामत, नगरसेवक कामिल बार्रेटो, अधिकारी पुनम बुधोलकर, रवीन्द्र भवनचे सदस्य सुनील नाईक, अमेय करमली व अन्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT