Goa Sunburn Dainik Gomantak
गोवा

Goa Sunburn 2024: नाताळनंतर वाजणार सनबर्नची धून; गोव्याला मिळणार 2 कोटी 27 लाखांचा महसूल

Sunburn Music Festival Revenue: सनबर्न संगीत महोत्सवातून राज्य सरकारला २ कोटी २७ लाख १५ हजार रुपये मिळणार आहेत

Akshata Chhatre

धारगळ: गोव्यातील प्रसिद्ध सनबर्न संगीत महोत्सवाला उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाली असल्याने यंदाच्यावर्षी देखील राज्यात हा संगीत महोत्सव होणार आहे. नाताळनंतर म्हणजेच २८ ते ३० डिसेंबरपर्यंत हा महोत्सव रंगेल. तुम्हाला माहिती आहे का या सनबर्न संगीत महोत्सवातून राज्य सरकारला २ कोटी २७ लाख १५ हजार रुपये मिळणार आहेत. सनबर्न संगीत महोत्सवात आयोजक कंपनीला १ कोटी ९९ लाख ६५ हजार रुपयांचे डिपॉझिट ठेवावे लागेल आणि कार्यक्रमाच्या शेवटी हे त्यांना परत केले जाईल.

गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यात सनबर्न होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम होतं, काही दिवसांपूर्वी धारगळमध्ये होणाऱ्या सनबर्न महोत्सवाबाबत दोन मतप्रवाह असताना गोवा पर्यटन खात्याने महोत्सवाला तत्वत: मान्यता होती.

त्यानंतर ॲड जनरल देविदास पांगम यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सरकारचे निर्देश आणि उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांसह सनबर्नला परवानगी दिली गेली.

डिसेंबर महिना म्हटलं की वर्षभराच्या तुलनेत गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते. बाकी कोविडची दोन वर्ष वगळल्यास गोव्यात सनबर्न हा संगीत महोत्सव नेहमीच व्हायचा. सनबर्न सारख्या संगीत महोत्सवांमुळे पर्यटनावर आधारित व्यवसायांना फायदा होतो असं म्हटलं जातं आणि यानुसार सर्व नियम व अटींचे पालन करून आणि आवश्यक परवाने मिळवून हा संगीत महोत्सव साजरा करायला हरकत नसल्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे . मुंबई उच्च न्यायालयाने देखील या महोत्सवाला सशर्त मान्यता दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT