धारगळ: यंदाच्या सनबर्न फेस्टिव्हलला शासकीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत गोव्यात सनबर्नचे आयोजन करण्यात येणार आहे. पेडण्यासह धारगळमध्ये सनबर्न आयोजनाच्या ठिकाणावरुन एकच वादंग माजला होता. मात्र आता वादग्रस्त सनबर्न आयोजनाच्या जागेचा प्रश्न सुटला. याचदरम्यान, धारगळच्या सरपंचांनी दिलेल्या प्रतिक्रियेची सर्वत्र चर्चा होत आहे. हे जे काही घडतयं ते वरुनच घडतयं. आम्ही फक्त बळीचा बकरा ठरतोय, अशी खंत धारगळचे सरपंच सतीश धुमाळ यांनी बोलून दाखवली.
'हे जे काही घडतं ते वरुनच घडतं, आम्ही फक्त बळीचे बकरा ठरतोय' सनबर्नला मान्यता दिल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धारगळचे सरपंच सतीश धुमाळ यांची ऑन कॅमेरा कबुली दिली. सनबर्नला मान्यता देण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता.
सोमवारी (दि. 2 डिसेंबर) धारगळ पंचायतीची पाक्षिक बैठक पार पडली. या बैठकीत सनबर्न व्हावा की नाही यावर दोन्ही गटांमध्ये सखोल चर्चा झाली आणि पंचायतीच्या अंतिम निर्णयाप्रमाणे आता गोव्यात यंदाच्यावर्षी देखील सनबर्न फेस्टिव्हल होणार आहे. चार विरुद्ध पाच अशा या गणितात शेवटी पाच जणांचा विजय झाल्याने पंचायतीने धारगळीत होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी दिली. सोमवारी होणाऱ्या बैठकीत जो निर्णय होईल त्याप्रमाणे पुढील दिशा ठरेल असे वक्तव्य सरपंच सतीश धुमाळ यांनी केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.