Sunburn Dainik Gomantak
गोवा

Goa Sunburn Death Case: पाच प्रकारच्या अमलीपदार्थाचा ओव्हरडोस आणि दारू; ‘सनबर्न’ मधील तरुणाच्या मृत्यूचे प्राथमिक कारण उघड

Delhi Youth Death at Sunburn: प्राथमिक अहवालानुसार कश्यपच्या किडनी, फुफुसांना मार बसला होता आणि मेंदूला सूज आली होती हे सर्व ड्रग ओव्हरडोजचे सूचक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Akshata Chhatre

Goa Sunburn Festival 2024 Death Case

पणजी: धारगळ येथे आयोजित ‘सनबर्न’ संगीत महोत्‍सवात सहभागी झाल्‍यानंतर मृत्‍युमुखी पडलेल्‍या करण बाबू कश्‍यप (२६, रा. नवी दिल्ली) याचे शवविच्छेदन गोमेकॉच्‍या फॉरेन्सिक मेडिसिन विभागात करण्यात आले. तरुणाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी केलेल्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली.

ओव्हरडोसमुळे किडनीला इजा झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले होते. गोवा मेडिकल कॉलेजच्या प्राथमिक अहवालानुसार कश्यपच्या किडनी, फुफुसांना मार बसला होता आणि मेंदूला सूज आली होती. हे सर्व ड्रग ओव्हरडोजचे सूचक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

प्राथमिक चाचणीतून कश्यप याने एकाचवेळी पाच विविध प्रकारच्या ड्रग्सचे सेवन केल्याचा खुलासा झालाय. कश्यपच्या रक्तात डॉक्टरांना दारूसह फेंटॅनाइल, बेंझोडायझेपाइन, ॲम्फेटामाइन आणि मेथॅम्फेटामाइन यांचे मिश्रण आढळून आले. कश्यपने ड्रग्सवर दारूचे सेवन केल्याने त्याचा धोका आणखीन बळावला होता.

हे सर्व ड्रग्स आणि दारू यांचे मिश्रण त्याच्यासाठी घटक ठरले, कदाचित दारूचे सेवन न केल्यास त्याचा जीव वाचला असता असे विधान डॉक्टरांनी केले आहे. अद्याप तरुणाच्या मृत्यूचा अधिकृत शवविच्छेदन अहवाल प्रलंबित असून प्राथमिक निष्कर्ष मात्र पूर्णपणे अमलीपदार्थांच्या सेवनाचा हा भयंकर परिणाम असल्याचे निर्देशित करतो.

‘सनबर्न’मध्‍ये सहभागी होण्यापूर्वी कश्यपने मद्य किंवा ड्रग्ज घेतले होते का याची माहिती त्याच्या मित्रांच्या जबान्यांमधून मिळविण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. कश्यपच्‍या किडनीला इजा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केल्याने त्याच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी चर्चा केली होती, मात्र तसा काही आजार नसल्याचे कुटुंबीयांकडून स्पष्ट करण्यात आले. कश्यपचे वडील आणि बहीण गोव्‍यात आले होते. त्‍यांनी कश्यपचा मृतदेह विमानाने दिल्लीला नेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: तांबोशे झाले आता उगवे! 'ओंकार'मुळे शेतकरी त्रस्त; भातशेती, केळी, पोफळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Goa Politics: '2027 मध्ये भाजपचे 27 आमदार येणारच'! मुख्यमंत्र्यांचा ठाम विश्वास; तेंडुलकरांचे केले कौतुक

Goa Tourist: हुर्रे! 6 महिन्यांत 5.45 लाख पर्यटक; नव्या फ्लाईट्स, क्रूझमुळे फुलले पर्यटन

Goa Live Updates: कोलव्यात क्लिनिकला आग

Goa Tourism: बाईक रेंट कमी, शॅक उभारणी! गोव्‍यासमोर महाराष्‍ट्र, कर्नाटकचे आव्‍हान; पर्यटनक्षेत्रात वाढली स्पर्धा

SCROLL FOR NEXT